स्मशानभूमिसाठी रोकडे बंधूनी दिली 10 गुंठे जमिन मोफत

सातारा एकनाथ थोरात : शेतकरी नारायण रोकडे, वसंत रोकडे यांनी सर्व समाजातील लोकांचा अंत्यविधीचा प्रश्‍न मिटावा म्हणून स्वत:ची 10 गुंठे जमिन बिनामोबदला स्मशानभूमिसाठी देण्याचा ठराव ग्रामसेभेत घेण्यात आला. तसेच स्मशानभूमिचा नव्याने प्रस्ताव तयार करुन तो तातडीने शासनाकडे मंजूरीसाठी पाठविण्यात येणार आहे. यानंतर स्मशानभूमिचा स्वतंत्र 7/12 उतारा तयार करुन 14 वा वित्त आयोगाअंतर्गत महिला व पुरुषांसाठी स्वच्छतागृह, बाग, बॅचेसची सुविधा आदी कामे मार्गी लावली जातील असे स्पष्ट करण्यात आले.
सोनगाव तर्फ सातारा येथील ग्रामपंचायतीच्या वतीने 26 जानेवारी 2019 रोजी विशेष ग्रामसभा भैरवनाथ मंदिराच्या सभागृहात सरपंच पांडूरंग नावडकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली होती. या सभेला उपसरपंच प्रकाश जाधव, ग्रा. पं. सदस्य, महेश नावडकर, दत्तात्रय सुतार, अंकुश बाबर, संगीता मोरे, पिलाबाई नावडकर, रंजना कुंभार, कमल नावडकर, प्रभावती मुळीक, ग्रामसेवक मदन जगताप, कर्मचारी अमोल नावडकर, किरण मोरे, स्नेहल चव्हाण, शेखर जाधव, सुरेश कांबळे उपस्थित होते. प्रारंभी ग्रामसेवक जगताप यांनी मागील सभेचे इतिवृत्तांत वाचून दाखविले.
पाणीपट्टी मध्ये 400 रुपये वाढ करणे, नळ कनेक्शनसाठी डीपॉझीटमध्ये वाढ करणे, नवीन गाळे बांधकाम मंजूरी, सोनगाव येथील कचरा डेपोत सातारा नगरपालिका सोडून उपनगरातील ग्रामपंचायतीना कचरा टाकण्यास कर भरण्याचा ठराव यासह एकूण 13 ठराव ग्रामसभेत मंजूर करण्यात आले. यावेळी झालेल्या चर्चेत ग्रामस्थ अरुण कदम, उत्तम नावडकर, हणमंत जाधव, शिवाजी जाधव, संतोष मुळीक यांंनी भाग घेतला होता.
पोलीस बंदोबस्तामध्ये काट्याचे फेस हाटविले
उरमोडी नदीच्या तीरावर असलेल्या स्मशानभूमित टाकलेले काटेरी फेस सातारा तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पो. नि. शिवाजी जाधव यांच्या उपस्थितीत ग्रामसभा झाल्यानंतर ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत हाटविण्यात आले. यामुळे गावात स्मशानभूमिवरुन वाढलेले तणावाचे वातावरण निवळले आहे.
पांडूरंग नावडकर, सरपंच

प्रगतशिल पाच शेतकर्‍यांचा सत्कार
दुध संकलन, उस उत्पादक, विक्रमी आले उत्पादक, महिला व्यवसाय, भाजी पाला उत्पादक शेतकरी सचिन हेळकर, दिपक क्षीरसागर, राजेंद्र गायकवाड, हणमंत जाधव, योगेश नावडकर, अशोक जाधव, चतुरा कुंभार, रुपाली नावडकर यांचा स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ देवून प्रजासत्ताकदिनी रेश्मा बाळासाहेब नावडकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला.