संकटकाळी विद्रोही सांस्कृतिक चळवळीने निभावली सामाजिक जबाबदारी

सातारा दि.१० –  बंगळुरू येथील अझीम प्रेमजी फिलान्थ्रोपिक इनिशिएटिव्ह (APPI) यांच्या आर्थिक सहकार्याने सोपेकॉम ट्रस्ट,पुणे आणि विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा शहर आणि परळी खोऱ्यातील गावांमधील गरजू नागरिक व विद्यार्थी अशा ५० कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप  कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या स्मृतिदिनी पार पडले.
         विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे कार्याध्यक्ष कॉ.धनाजी गुरव , कॉ. विजय मांडके,  प्रा.गौतम काटकर  युवराज जाधव आणि शिवराम ठवरे यांनी सोप्पेकॉम ट्रस्टचे के.जे जॉय यांच्याकडे याबाबत पाठपुरावा केला आणि मदत उपलब्ध करून दिली.
      साहित्य वाटपाची सुरुवात कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे, विद्रोही सांस्कृतिक चळवळ, महाराष्ट्रचे उपाध्यक्ष कॉ. विजय मांडके , प्रा. आर. एम घाडगे ,  प्रा विजय पवार , आणि पोलीस कर्मचारी निलेश दयाळ यांच्या उपस्थितीत प्रातिनिधीक स्वरूपात   घेऊन सातारा शहरात केली .यानंतर स्वतंत्र गाडीमधून दिवसभरात सातारा शहरातील समर्थ मंदिर, कमानी हौद, गडकरी आळी तर परळी खोऱ्यातील कोळशी, कारी, जकातवाडी, शहापूर, साठेवाडी, सोनगाव, शेळकेवाडी, कुसावडे, पाडळी, कौदणी आणि यवतेश्वर येथे अन्न – धान्याचे किट योग्य अंतर ठेऊन (Physical Distance) वाटप करण्यात आले.
 यासाठी विशेष परिश्रम गणेश दुबळे, महेश गुरव, शुभम ढाले, संकेत माने आदिंनी घेतले.