स्वरसाधनाच्या गुरु स्व.श्रीमती साधनाताई जोशी यांना स्मृतीदिनी अभिवादन ; ऋषिकेश बोडस यांच्या कडून भुप रागाचे सुश्राव्य गायन


साताराः येथील स्वरसाधना संगीत विद्यालयाच्या वतीने गुरु स्व.श्रीमती साधनाताई जोशी यांच्या  सातवा स्मृतीदिन नुकताच त्यांच्या शिष्यांनी   संगीत मैफिलंचे आयोजन करुन साजरा केला.यादोगोपाळ पेठेतील सुपनेकर हॉल येथे  आयोजन करण्यात आलेल्या या स्मृतीदिन सोहळ्यात  साधनाताईच्या शिष्या डॉ. सौ.संगीता कोल्हापूरे यांनी गायन सादर केलेे. त्यांनी यावेळी हंसध्वनी रागातील स्वत: रचलेली ..जय माता भवानी,दयानी.. ही बंदिश  व तराणा सादर केला. त्यांना  तबला साथ अमेय देशपांडे यांनी तर संवादिनी साथ  विनायक हसबनीस व संवादिनी साथ सौ.संगीता सुतार  यांनी केली. पखवाज साथ केशव कुंभार यांचीे होती.
या कार्यक्रमात  डॉ.सौ.संगीता कोल्हापूरे व सौ.प्रज्ञा लाटकर यांनी मागील सात वर्षातील विद्यालयाच्या कार्याचा आढावा  घेत साधनाताइर्ंच्या कायार्ंची ओळख उपस्थितांना करुन देताना स्वरसाधना संगीत विद्यालयात गायनाचे शिक्षण घेणार्‍या अनेक शिष्यांनी साधनाताईंना आपल्या गायन व वादनातूनच आदरांजली वाह्ण्याचा सुरु ठेवलेला उपक्रम हा स्तुत्य असल्याचे सांगितले.
आपले मनोगत व्यक्त करताना प्रज्ञा लाटकर म्हणाल्या की,पं.जानोरीकर बुवांच्या कडून मिळालेली विद्या ही साधनाताईच्या गाण्यात दिसून येत असे. गाण्यातला गोडवा, पल्ला, ताना, यमक हे सर्व त्यांच्या गायनात असे. अनेक संकटे कोसळूनही त्यांनी जीवनभर संगीताला वाहून घेतले.गुरु व आई म्हणून मला तिनेच घडवले. सातार्‍यात गायकांना व्यासपीठ मिळावे म्हणुन आजपयर्ंंत गेले सात वर्षे संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकारांना या स्मृतीदिनी आणून त्यांचे गायन,वादन व मार्गदर्शनामुळे हा स्मृतीदिनाचा कार्यंक्रम खरोखरच आगळा वेगळा व लोकप्रिय होत असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या अध्यक्षा श्रीमती लीलाताई करंबेळकर ,इंदिरा आलटकर  यांचा सत्कार  सौ.प्रज्ञा आगटे यांनी केला.
या कार्यक्रमात अखिल भारतीय गांधर्व महा दिव्यालयाच्या वतीने घेतेललेया परीक्षैत तब्बल 800 केंद्रातु निवडल्या गेलेल्या सातारच्या तबला वादक अमेय देशपांडे व पखवाज वादक केशव कुंभार  यांचा विशेष सत्कार विद्यालयाच्या वतीने करण्यात आला.हे दोघे वादन कौशल्यात विशेष प्रविण असल्याने त्यांची ही निवड साथं असून त्याचा सातारकरांना अभिमान आहे. असे यावेळी सत्कार करताना श्रमती लीलाताई करंबेळकर यांनी सांगितले.
यावेळी सुप्रसिध्द् गायक हृषीकेश बोडस यांचा सत्कार सौ.प्रज्ञा आगटे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.  बोडस यांनी आपल्या गायनाची सुरुवात भूप रागाने करीत  यात ..अब तो मान ले पिया.. ही बंदिश झुमरा तालात  सादर करुन त्रिवट गावून देस राग सादर करत  तराणा आणि त्यानंतर .. कोण तुझ सम सांग गुरुराया.. हे नाट्यगीत सादर केले. संत ज्ञानेश्‍वरांच्या अभंगाने आपल्या या गानसेवेची सांगता केली. सर्व मान्यवरांचा सत्कार डॉ.सौ.संगीता कोल्हापूरे व सौ.प्रज्ञा लाटकर यांनी शाल, श्रीफळ व भेटवस्तू देउन केला.
अध्यक्षीय भाषणात श्रीमती लीलाताई करंबेळकर यांनी संसार आणि गाणे गूप अवघड आहे. मी अनेक दिग्गज गायकांसोबत शिकत राहीले, मी छोटी गायिका असून आज स्व.साधनाताईच्या शिष्यांनी  त्यांच्या पश्‍चात सुरु ठेवलेला हा उपक्रम खरोखरच मोठा आणि स्तुत्य आहे असे सांगितले.  सुत्रसंचालन सौ. नेहा भुरके यांनी केले तर आभार डॉ. सौ.संगिता कोल्हापूरे यांनी मानले. कार्यक्रमास स्व.साधनाताईंच्या शिष्या सौ.उषा शानभाग,सौ. मेधावी पुरोहित,सौ. वाळींबे,सौ.रेवती बंड,सुधीर पाध्ये, जयपूर घराण्याच्या गायकीचा अभ्यास करणारे गायक संजय दिक्षीत, श्री.देवी,अनील गोडबोले,डॉ. कोल्हापूरे, डॉ.समीर सोहोनी.मंदार ढवळे, विजय गवाणकर, संगीत शिक्षक  संजय कान्हेरे यांचेसह विविध क्षेत्रातील संगीत प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

(छाया: अतुल देशपांडे )