सातारा देशाला दिशा देणारा जिल्हा : संदीप पाटील ; सर्व संघटनांच्यावतीने पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांचा सत्कार 

सातारा : प्रत्येकाला व्यासपीठ मिळणे गरजेचे असते, ते प्रशासनाचे काम असते. दीपकजी बोलले ते पूर्णपणे अर्थपूर्ण आहे. त्यांनी 2004 मध्ये जे काम केले. तोच प्रयोग यापुढे करुया. मला साताऱयाचा अभिमान आहे. एसपी म्हणून काम करण्याची संधी मिळाली. साताऱयात जी सामाजिक सलोखा रॅली निघाली. त्या रॅलीने समाजाला दिशा देण्याचे काम केले. सातारा हा देशाला दिशा देणारा जिल्हा आहे, अशी स्पष्टोक्ती पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी केली.
पोलीस प्रशासनाच्यावतीने यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालयाच्या सभागृहात सामाजिक सलोखा बैठकीत ते बोलत होते. यावेळी भारिपचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत, गणेश भिसे, शिवराज्यभिषेक उत्सव समितीचे दीपक प्रभावळकर, नगराध्यक्षा  माधवी कदम, स्मिता घोडके, जि. प. सदस्या अर्चना देशमुख, भाजपाचे गटनेते धनंजय जांभळे, नगरसेवक विजय काटवटे, सुनील कोळेकर, मुस्लिम संघटनेचे सादिकभाई शेख, रिपब्लिकन एम्लाईजचे गणेश दुबळे, मराठा क्रांती मोर्चाचे क्षीरसागर, रिपाइंचे शरद गायकवाड, मराठा मोर्चाचे बापू क्षीरसागर, शरद जाधव, सादिकभाई बेपारी यांच्यासह शहरातील बहुतांशी सर्व संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
पोलीस अधीक्षक संदीप पाटील म्हणाले, साताऱयाचा मला अभिमान आहे. सातारचा एसपी म्हणून काम करण्याची संधी मिळाली हे मी भाग्याचे समजतो.  कारण येथे छत्रपती शिवरायांची राजधानी आहे. डॉ. बाबासाहब्ीा आंबेडकर हे सुद्धा येथेच शिकले. या महामानवाने जगात क्रांती घडवली. त्यामुळे ही माती पवित्र आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, क्रांतीसिंहाचाही हाच जिल्हा आहे. ब्रिटीशांचे बळ याच मातीने उखडून टाकलं होत. फुले दाम्पत्यही याच जिह्यातील असल्यामुळे या मातीतून किती मोठी माणसं जन्माला आली आहेत.
सातारा जिल्हयात  विचारवंत असतील शुरवीर असतील, आताच्या काळातील राजकारणी असतील तर हा  जिल्हा देशाला दिशा देणाराच ठरला आहे. तरुण भारतच्यावतीने काढण्यात  आलेली सलोखा रॅलीने सुद्धा  समाजाला दिशा दिली आहे, असेही पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले.
दीपक प्रभावळकर म्हणाले, हिंदवी स्वराज्याच्या राजधानीत बैठकीत आपण बसलो आहोत. देशाला दिशा दिली पाहिजे, आपल्या पुर्वजांनी काय केलयं हे सर्वांनी माहिती असलं पाहिजे. तीन जिह्यातील उठावांमुळे स्वातंत्र्य मिळाले. ते तीन जिल्हे म्हणजे मिदानापूर, बलिया आणि सातारा. नितीन बानुगडे-पाटील सांगतात मुठभर माती ग्लासभर पाण्यात टाकली तर तवंग येईल रक्तांचा. एवढ मोठं या मातीचं महत्व आहे. खैरलांजीची दंगल झाली तेव्हा महाराष्ट्र पेटला होता पण सातारा शांत होता. अमरावतीत महामानवाची विटबंना झाली तेव्हाही असाच प्रकार. साताऱयातही दंगल होणार हे ग्रहीत धरुन आम्ही अशोकबापू, किशोरभाऊ, वर्षाताई यांना फोन करुन आकार हॉटेलमध्ये जमलो. तेथे बैठक झाली. बिटबंना करणारी दोन प्रकारचे माणसं असतात. ज्यांना महामानव कळले ते अवमान करणार नाहीत. त्यासाठी महाराष्ट्र पेटवायचा का?, ज्यांना महामानव कळले तो हातात दगड घेणार नाही. जमावबंदीचा आदेश तोडायचा नाही. आपला राग आहे, संताप आहे. तो जिल्हाधिकाऱयांना केवळ शिष्टमंडळाने जावून कळवूया. राग आहे तर लिहूया, निंबंध स्पर्धा घेवूया. त्यानुसार निबंध स्पर्धा घेतली गेली. विजेत्यांना प्रसिद्धी दिली. दर चार वर्षांनी दंगली होत राहतात. कारण निवडणूका तोंडावर असतात. 2004 बाबरी मशिदीचा मुद्दा निघाला. तो थांबल्यानंतर पुन्हा कबरीचा मुद्दा निघाला. आम्हाला उदात्तीकरण अमान्य आहे. ती कबर छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधली.
सगळया पदाधिकाऱयांनी प्रशासनाला साथ केली. आंदोत्सवाच्या नावाखाली पाचवड दंगल झाली. त्यामध्ये जिह्यातील एकही नव्हता. बाहेरुन आयात केले होते. परवा पण असच घडले. कोरेगाव भीमामध्ये सातारा बंद होते. यावेळी सामाजिक सलोखा रॅली काढण्याचे ठरले. या रॅलीत सगळया जातीचे धर्माचे लोक आले. साताकर माणूस म्हणून सामाजिक सलोखा रॅली काढली, असे त्यांनी सांगितले. यावेळी अनेक युवक, युवतीनीही आपली मते मांडली.