एसटी महामंडळाचा सुवर्णकाळ परत आल्याशिवाय राहणार नाहीः पतंगे

केळघरः केवळ सुरक्षित प्रवास या विश्वासामुळेच राज्यातील कानाकोप़र्‍यातील दुरगम भागातील प्रवासी हे एसटी महामंडळाशी जोडलेले आहेत. प्रवाशांना इच्छितस्थळी पोचवण्यासाठी एसटी महामंडळाचे कमर्चारी निरपेक्षपणे काम करीत आहेत.स्पर्धेच्या काळात खासगी वाहतुकीला शह देवून महामंडळाच्या उत्पन्न वाढीसाठी महामंडळाच्या कामगारांनी एकदिलाने काम केल्यास एसटी महामंडळाचा सुवणर्काळ परत आल्याशिवाय राहणार नाही.यासाठी सवार्ंनीच योगदान देणे आवश्यक आहे.असे प्रतिपादन महाबळेश्वर आगाराचे आगार व्यवस्थापक नामदेवराव पतंगे यांनी केले.
महाबळेश्वर आगारातून प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झालेले लेखनिक एम.बी,मोहिते, रोखपाल प्रकाश गायकवाड, चालक आर.एस.जाधव, चालक एम.ए.बरगे, वाहक प्रदीप निकम हे सेवानिवृत्त झाले.त्यानिमीत्त आयोजित सेवानिवृत्ती सत्कार कायर्क्रमात ते बोलत होते.यावेळी सहाय्यक कायर्शाळा अधिक्षक रोहिदास खुटवड, वरिष्ठ लेखाकार अमोल शेलार, वरिष्ठ लिपीक महेश शिंदे, सेवानिवृत्त वाहतूक नियंत्रक शामराव निंबाळकर, वाहतूक नियंत्रक चंद्रकांत वळकुंदे, कामगार संघटनेचे अध्यक्ष दिलीप बोराटे, सचिव आसिफ मुजावर, विकास कांबळे,संतोष शिंदे, बबन दुदुस्कर, संतोष सावंत,कैलास मुळीक, वसंतराव गाडवे, श्री.काटकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
सत्काराला उत्तर देताना एम.बी,मोहिते, रोखपाल प्रकाश गायकवाड, चालक आर.एस.जाधव, चालक एम.ए.बरगे, वाहक प्रदीप निकम यांनी महाबळेश्वर आगारात सवर् कामगारांनी, आधिका़र्‍यांनी चांगली साथ दिल्यानेच प्रदीर्घ सेवा करू शकलो असे सांगितले. चंद्रकांत वळकुंदे यांनी स्वागत केले.