सातारा जिल्हा खेळातही अग्रणी ; बॅडमिंटन मध्येही निर्माण व्हावेत आंतरराष्ट्रीय खेळाडू : जिल्हाधिकारी 

????????????????????????????????????

सातारा :  सातारा जिल्हा हा खेळात अग्रणी आहे. या वर्षी राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धा आयोजनाचा मान आम्हाला मिळाला त्याचे आम्ही सोने करु, जगभरात लोकप्रिय होत असलेलल्या बॅडमिंटन मध्ये भारताच्या सायना नेहवाल, पि. बी. सिंधू,  गोपीचंद यांनी मोठे नाव कमावले आहे. या स्पर्धेतूनही असेच आंतरराष्ट्रीय स्पर्धक निर्माण व्हावेत, एवढी गुणवत्ता आपल्या खेळाडुंमध्ये असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी केले.
सातारार्‍याच्या छत्रपती शाहू स्टेडियम मध्ये आज राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्या  बोलत होत्या. या प्रसंगी सातारा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा माधवी कदम, राज्य बॅडमिंटन असोसिएशनचे उपाध्यक्ष छत्रपती शिवाजीराजे भोसले, या स्पर्धेचे चीफ रेफरी अजय चव्हाण, जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास पाटील, राज्य बॅडमिंटन असोसिएशनचे प्रतिनिधी साधले उपस्थित होते. राज्यभरातून सातार्‍यात या राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत खेळण्यासाठी आलेल्या स्पर्धकांचे या ऐतिहासिक आणि खेळाच्या भूमीत स्वागत करते. हा खेळ जगभर लोकप्रिय होत आहे, त्यात भारताचा सहभाग मोठा आहे, अशा स्पर्धांतून आणखी चांगले खेळाडू निर्माण व्हावेत यासाठी शासनाचे प्रयत्न आहेत, असे जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी सांगितले.शहरात अशा प्रकारच्या स्पर्धा पहिल्यांदाच होत आहेत. या स्पर्धेसाठी नगरपालिकेकडून सर्व सहकार्य करु. उत्तम खेळाडू निर्माण करताना जिल्हा क्रीडा प्रशासनाच्या पाठीशी नगर परिषद असेल असे नगराध्यक्षा माधवी कदम यांनी सांगितले.
बॅडमिंटनच्या राज्यस्तरीय स्पर्धा सातार्‍यात होत आहेत याचे कौतुक आणि आनंद होत असून राज्यभरातून आलेल्या गुणे खेळाडूंनी आपला उत्कृष्ट खेळ दाखवावा असे सांगून, छत्रपती शिवाजीराजे भोसले यांनी स्पर्धेसाठी मुलांना शुभेच्छा दिल्या.या स्पर्धेच्या मागची भूमिका, स्पर्धेची तयारी, याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितली.
ना. श्री. विजय शिवतारे, राज्यमंत्री जलसंपदा, जलसंधारण व संसदीय कार्य महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सातारा जिल्हा हे स्पर्धकांना शुभेच्छा व प्रोत्साहन देण्यासाठी दिनांक 10 नोव्हेंबर रोजी सकाळी 9.00 वा. भेट देणार आहेत. स्पर्धेतून निवड झालेल्या 17 वर्षाखालील मुला-मुलींचा महाराष्ट्र राज्याचा संघ दि. 20 नोव्हेंबर 2017 या कालावधीत कडापा येथे होणार्‍या राष्ट्रीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत सहभागी होणार आहे.

जिल्हाधिकारी खेळल्या बॅडमिंटन
राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे उद्घाटन झाल्यानंतर जिल्हाधिकारी श्वेता सिंघल आणि नगराध्यक्षा माधवी कदम यांनी बॅडमिंटन कोर्टात उतरुन प्रतयक्ष बॅडमिंटन खेळून स्पर्धेचे उद्घाटन केले.  विद्यार्थ्यांना  प्रात्साहन देण्यासाठी जवेढे शब्द गरजेचे आहेत तेवढेच त्यांच्या बरोबर मिसळून आम्हीही तुमच्यातलेच एक आहोत, आत्मविश्वास  देणं गरजेचे असते.  जिल्हाधिकारी आणि नगराध्यक्षांच्या बॅडमिंटन खेळाताना विद्यार्थ्यांनी जो जल्लोष केला हे त्याचेच प्रतिक होते.