म्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील

म्हासुर्णे ( प्रतिनिधी  तुषार माने) :- म्हासुर्णे ता.खटाव येथील पवारवाडी शाळेत विद्यार्थी व विद्यार्थीनी यांनी आकाशकंदील बनवले.ग्रामीण भागातील मुलांमध्ये अंगभुत कला कौशल्य असतात.त्यांना योग्य मार्गदर्शन लाभले तर त्यांचे भावी आयुष्य फुलते.विद्यार्थ्यांच्यासाठी एरवी आकाशकंदील म्हणजे दुर्लभ गोष्ट पण म्हासुर्णे गावातील (पवारवाडी) शाळेतील मुलांनी नवनिर्मितीचा प्रत्यय देताना स्वतः आकाशकंदील तयार केले आहेत यातुन यंदाच्या दिवाळीत सर्वत्र घरामध्ये लहान मुलांनी तयार केलेले आकाशकंदील पहायला मिळणार आहेत.
म्हासुर्णे हे खटाव तालुक्यातील गाव याच गावात आकाशकंदील बनवण्याची एक आगळी वेगळी कार्यशाळा घेण्यात आली. ही कार्यशाळा सर्वाच्या साठी कौतुकाचा विषय बनली.इतर वेळी मुलांच्यासाठी आकाशकंदील ही तशी दुर्लभ गोष्ट मात्र यंदाच्या दिवाळीत मुलांनी स्वतः च्या हातांनी बनवलेल्या आकाशकंदीलाची भेट घरच्यांना दिली.
जरग गुरुजी हे हुरहुन्नरी शिक्षक त्यांनी या कामी पुढाकार घेतला. श्री.जरग गुरुजी यांनी यापुर्वी विविध कार्यानुभव कार्यशाळातुन मुलांना मार्गदर्शन केले आहे.यावेळी त्यांनी मुलांना आकाश कंदील बनवण्याचे प्रात्यक्षिक दाखवले.त्यासाठी फाईल कार्ड पेपर,पताका,प्लोरोसन पेपर,टिंटेड पेपर, पेपरचा वापर केला. त्यातुन अत्यंत सुबक आकर्षक आकाशकंदील आकारास आले. हे पाहुन मुलांच्या चेहऱ्यावर हसु फुलले.मुख्याध्यापक मंगल माने(मँडम) यांनीही मुलांना मार्गदर्शन केले. म्हासुर्णे गावचे सरपंच सचिन माने,शिक्षण सल्लागार मंडळाचे चेअरमन महादेव माने,म्हासुर्णे ग्रामपंचायत सदस्य व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पवारवाडी शिक्षण कमेठी संचालक तुषार माने, शिक्षण कमेठी अध्यक्ष विश्वनाथ माने,उपसरपंच सुहास माने,ग्रा.प.सदस्य विठ्ठल माने,संगिता गुरव,सिकंदर मुल्ला,आबा यमगर,वंदना माने,गुलाब वायदंडे,सिताबाई माने,तृप्ती थोरात,कुसुम माने,दिव्या पवार,नलिनी कुलकर्णी व ग्रामस्थ यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.