म्हासुर्णे येथील सुहास चव्हाण यांची लेखापरीक्षक पदी निवड

म्हासुर्णे : (तुषार माने प्रतिनिधी) म्हासुर्णे.ता.खटाव येथील म्हासुर्णे गावचे सुपुत्र सुहास किसन चव्हाण यांची महाराष्ट्र लेखापरीक्षक व लेखा सेवेअंतर्गत नगरपरिषद लेखापरिक्षक (क्षेणी ब) पदी निवड झाल्याबद्द्दल सर्व स्तरातुन हार्दिक अभिनंदन होत आहे .अतिशय खडतर प्रवासातुन शिक्षण घेवुन उच्च पदावर निवड झाली व म्हासुर्णे गावाचे नाव उज्वल केले त्याबद्दल सर्व स्तरातुन त्यांचे कौतुक होत आहे.
या निवडी बद्दल म्हासुर्णे गावचे सरपंच सचिन माने, श्रीराम विद्यालयाचे चेअरमन महादेव माने,उपसरपंच सुहास माने, ग्रामपपंचायत सदस्य तुषार माने,विठ्ठल माने,रामचंद्र माने,सुनिल शहा,प्रा.ज्ञानेश्वर माने,(सर),ए.आर.दबडे (सर),एम.पी.माने(साहेब)सिकंदर मुल्ला,आबा यमगर ,गुलाब वायदंडे,संगिता गुरव,तृप्ती थोरात,वंदना माने,कुसुम माने,दिव्या पवार,सिताबाई माने,नलिनी कुलकर्णी,तसेच म्हासुर्णे गावातील क्रांती गणेश मंडळ,माऊली गणेश मंडळ व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.