मायणी येथे विवाहितेची आत्महत्या 

मायणी :  – ( सतीश डोंगरे )येथील वडुज रोड परिसर राहात असलेल्या  शेजल प्रसाद जाधव  वय २० रा.  जांब ता.कोरेगाव जि.सातारा या विवाहितेने गळफास घेऊन राहत्या घरी आत्महत्या केली.   याबाबत मायणी पोलीस दूर क्षेत्रातून मिळालेली अधिक माहिती अशी, वडूज रोडलगत राहत असलेल्या कुटुंबातील एक विवाहित शेजल जाधव ही महिला आपल्या आईकडे मायणी येथे राहत होती.गतवर्षी बाळंतपणात तिचे बाळ दगावले होते. या घटनेमुळे तीचे मानसिककदृष्ट्या खच्चीकरण झाले होते तसेच डोक्याची शस्त्रक्रियाही झाली होती. त्यामुळे आजारपणाला कंटाळून या विवाहित महिलेने आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष गोसावी यांनी दिली.