म्हासुर्णे श्रीराम विद्यालयाचे तालुकास्तरीय स्पर्धेत यश

म्हासुर्णे : (तुषार माने प्रतिनिधी) सातारा जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ सातारा यांच्या वतीने तालुकास्तरीय निबंध, वक्तृत्व,चित्रकला,हस्ताक्षर काव्यगायन स्पर्धेचे आयोजन हनुमानगिरी हायस्कुल पुसेगाव येथे करण्यात आले होते त्या स्पर्धेत श्रीराम विद्यालय म्हासुर्णेच्या विद्यार्थीनी उज्वल यश संपादन केले होते.
लहान गट पाचवी ते सातवी मध्ये भाषण स्पर्धा कु.माने वैष्णवी नारायण द्वितीय क्रमांक मिळवला, निबंध स्पर्धेत कु.विभुते गायत्री संजय हिने तृतीय क्रमांक मिळवला.तसेच कु.माने श्रध्दा उत्तम हिला उत्तेजनार्थ तर हस्ताक्षर स्पर्धेत कु.माने श्रध्दा उत्तम हिचा द्वितीय क्रमांक प्राप्त केला.मोठा गट इयत्ता आठवी ते दहावी भाषण स्पर्धेत कु.हर्षा संजय द्वितीय क्रमांक मिळवला.निबंध स्पर्धेत कु.माने प्रिती आण्णा हिचा तृतीय क्रमांक पटकावला.तर हस्ताक्षर स्पर्धेत कु.कुंभार अपुर्वा अनंत हिचा द्वितीय क्रमांक मिळवला.व कु.माने संध्या संतोष हिचा उतेजनार्थ क्रमांक मिळवला.या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार हनुमानगिरी हायस्कुलचे प्राचार्य श्री .शिंदे सर यांच्या हस्ते झाला.वरील पैकी कुमारी वैष्णवी नारायण ,कु.श्रध्दा उत्तम माने,कु.हर्षा संजय माने,कु.कुंभार अपुर्वा अनंत या सर्व विद्यार्थ्यांनीची सातारा येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे .या सर्व विद्यार्थ्यांना श्री.परदेशी सर,श्री.केराम सर,श्रीमती माने मँडम यांनी मार्गदर्शन केले.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन शिक्षण सल्लागार मंडळाचे चेअरमन महादेव माने,सचिव राजाराम माने,सरपंच सचिन माने,ग्रामपंचायत सदस्य तुषार माने,मुख्याध्याप पी.व्हि.हांडे सर,संस्थेचे संचालक रामचंद्र माने,पांडुरंग माने,आर.जी.कुलकर्णी,व्हि.एल.सर,नथुराम यमगर,विलास माने,गोरख माने,भिमराव माने,किसन माने,स्वप्निल माने,शिवाजी माने व श्रीराम विद्यालयाचे शिक्षक राठोड सर,परदेशी सर,श्रीमती माने मँडम,म्हमाणे मँडम,शेख सर,तोरणे सर,केराम सर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.