Friday, April 19, 2024
Homeक्रीडागोपूजच्या सुशांतची सायकल स्पर्धेत सिकंदर बनण्यासाठी देशपातळीवर निवड ; राजस्थानातील वाळवंटात देणार...

गोपूजच्या सुशांतची सायकल स्पर्धेत सिकंदर बनण्यासाठी देशपातळीवर निवड ; राजस्थानातील वाळवंटात देणार दिग्गज स्पर्धकांना टक्कर

औंध:- सध्याच्या धकाधकीच्या युगात चालणे,फिरणे,व्यायाम करणे हे दुरापास्त झाले आहे .दुचाकी, चारचाकी वाहनांच्या जमान्यात तर सायकल ही अडगळीत जाऊन पडली आहे पण गोपूज गावचा रहिवासी व औंधच्या राजा श्रीपतराव महाविद्यालयाचा विद्यार्थी सुशांत गुरव हा आपल्या सायकलने देश पातळीवर पोहचला असून राजस्थानच्या वाळवंटात तो आपल्या अपार ,जिद्द व कष्टाच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावरील विजेतेपद मिळवण्यासाठी सज्ज झाला आहे.
सायकल रेसिंग स्पर्धा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभी राहते ती म्हणजे वाकडे-तिकडे हँडल,गिअर असणारी ,एकदम हलकी ,एक वेगळाच आकार असलेली सायकल ! परंतु एक साधी विना गिअरची सायकल घेऊन येणारा स्पर्धक स्पर्धत भाग घेतो आणि यशस्वी पण होतो तशीच एक कहाणी आहे एका जिद्दी युवकाची.
औंध येथील महाविद्यालयात बी एस सी च्या तिसऱ्या वर्षात शिकणारा विद्यार्थी व गोपुज गावचा रहिवाशी असणारा सुशांत बाळू गुरव याने महाविद्यालयाच्या वतीने हुपरी येथे सायकलिंग स्पर्धेत यश मिळविले.
तर त्यानंतर कोल्हापूर स्पोर्ट्स च्या वतीने
आयोजित स्पर्धेत त्याने द्वितीय क्रमांक मिळविला.या दोन्ही स्पर्धा त्याने एका साध्या सायकलवरून जिंकल्याने त्याच्या प्रचंड इच्छाशक्तीचे कौतुक होत आहे.
एका शेतकरी कुटुंबातील व जेमतेम परिस्थिती असलेल्या सुशांतने ज्यावेळी त्याची सायकल घेऊन हुपरी येथे स्पर्धेत पोहचला त्यावेळी त्याच्याकडे सगळ्या स्पर्धकांसह उपस्थित आश्चर्याने पाहतच राहिले एकीकडे लाखो रुपये किमतीच्या सायकली व दुसरीकडे विना गिअरची साधी सायकल असा हा मुकाबला झाला असता लाखो रुपयांच्या किंमतीच्या सायकलीना मागे टाकत त्याने आपल्या महाविद्यालयाची व खाजगी स्पर्धेत दोन्ही ठिकाणी यश मिळविले.
आता औंधच्या महाविद्यालयामार्फत तो राजस्थान येथे डिसेंबर च्या दरम्यान जाणार आहे त्याअगोदर त्याला सराव करण्यासाठी एक साधी परंतु नवीन सायकल असणे अपेक्षित होते,ही गोष्ट त्याने गोपुज गावातील ग्रामस्थांना बोलुन दाखवताच दहा मिनिटात यशवंत ग्रामीण वाचनालयाच्या कार्यालयात शुक्रवारी सकाळी अकरा हजार जमा झाले.

:-१)ही सायकल सुद्धा एका पाहुण्याकडून आणून तिला दुरुस्त करून स्पर्धेसाठी सुशांतने वापरली आहे.त्याला सामाजिक संघटनांनी मदत केल्यास त्यांच्यातील कौशल्य,जिद्द,व चिकाटीने तो गावासह जिल्ह्याचे नावही चमकवेल अशी सर्वांना आशा आहे.
२)माजी आयुक्त प्रभाकर देशमुख यांनीही त्याला रेसिंग ची सायकल घेण्यासाठी भरीव मदत देण्याचे आश्वासन दिले आहे, तसेच गोपुज येथील व सद्यस्थितीत पुणे येथील रचना कॉन्स्ट्रुक्शन चे प्रोपा. प्रताप देशमुख यांनीही त्याला सर्वतोपरी सहकार्य करण्याचा शब्द दिल्यामुळे त्याचा आत्मविश्वास बळावला आहे.

अपार जिद्द व मेहनत करण्याची तयारी असलेल्या सुशांतने साध्या सायकलने विजेतेपदे मिळविली पण देश पातळीवरील स्पर्धेत सिकंदर होण्यासाठी त्याला चांगली सायकल ,संपूर्ण किटची गरज आहे. अनेकांनी त्याचे कौतुक केले आता त्यास आणखी आर्थिक मदतीची गरज आहे . त्यासाठी जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेऊन सुशांतच्या जिद्दीला पुढील वाटचालीस बळ द्यावे हिच अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular