देशात पहिल्या क्रमांकाने सातारा जिल्हा स्वच्छता अभियानात प्रथम ; संपूर्ण जिल्ह्याचे टीमवर्क – जिल्हाधिकारी श्वेता सिंघल

2 ऑक्टोबर गांधी जयंतीला राजभवन नवी दिल्लीत पंतप्रधानांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण 
सातारा : पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वच्छ सर्व्हेक्षण 2018 अंतर्गत सातारा जिल्ह्याच्या देशात पहिला क्रमांक आला सून या पुरस्काराचे वितरण दि.2 ऑक्टोबर 2018 रोजी गांधी जयंतीचे औचित्य साधून राजभवन नवी दिल्लीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
दरम्यान स्वच्छ सर्व्हेक्षए 2018 अंतर्गत पुरस्काराची घोषणा बुधवारी केंद्रीय पेयजल व स्वच्छता विभागाचे उपसचिव यांनी केली आहे, अशी माहिती सातारा जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या सुत्रांनी दैनिक ग्रामोध्दारशी बोलताना दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ सर्व्हेक्षणात देशातील सर्वच जिल्ह्यातील निवड केलेल्या गावातील तपासणी केंद्रस्तरीय कमिटीने ऑगस्ट 2018 मध्ये केली होती. यामध्ये जिल्ह्यातील 16 गावाची तपासणी ऑगस्ट 2018 मध्ये केली होती. यामध्ये कुटुंबे, सार्वजनिक ठिकाणे, शाळा, समाजमंदिरे, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, धार्मिक़ स्थळे, याची तपासणी कमिटीच्या सदस्यांनी 16 गावात जावून केली होती.
स्वच्छ सर्व्हेक्षणअंतर्गत जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील लोकांच्या प्रतिक्रिया, मतदान मोबाईलच्या माध्यमातूननोंद केले होते. याला सातारा जिल्ह्यातून सुमारे 1 लाख 28 हजार लोकांचा प्रतिसाद मिळाला होता. केंद्रीय कमिटीने तपासणी केलेल्या गावासाठी 100 गुण ठेवले होते. स्वच्छ सर्व्हेक्षण अखेर सातारा जिल्ह्याने संपूर्ण देशात अव्वल येण्याचा माळ मिळविल्याने पदाधिकारी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
स्वच्छ सर्व्हेक्षणासाठी सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक – निंबाळकर, उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, सर्व सभापती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.कैलास शिंदे, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर जगताप, सर्व जि.प.सदस्य, पत्रकार यांचे मालाचे सहकार्य मिळाले आहे.
श्रमाचे फळ मिळाले 
सातारा जिल्ह्यातील जनता, पदाधिकारी, कर्मचारी तसेच प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी यांचे स्वच्छता चळवळीसाठी नेहमीच योगदान दिले आहे. त्यामुळे स्वच्छ सर्व्हेक्षणात सातारा जिल्हा देशात पहिला आला. अखेर श्रमाचे फळ मिळाले असेच म्हणावे लागेल.
 -डॉ.कैलास शिंदे 
मुख्य कार्यकारी अधिकारी 
जि.प.सातारा
संपूर्णं जिल्ह्याचे हे टीम वर्क
 सातारा.. देशस्तरावर घेतल्या गेलेल्या  स्वच्छता अभियान स्पर्धेत सातारा जिल्हयाने संपूर्ण देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे. या कामगिरीत जिल्ह्यातील सर्व टीमवर्कचा मोठा वाटा असून मागील तीन वर्षांत केवळ सध्याचे नव्हे तर या पुर्वीही राबलेल्या सर्व स्तरावरील अधिकारी, कर्मचारी आणि या अभियानात राबलेल्या प्रत्येकाचे हे योगदान आहे याचा मोठा आनंद वाटत आहे असे आनंदोद्गार जिल्हयाच्या जिल्हाधिकारी सौ.श्‍वेता सिंघल यांनी काढले.
– श्‍वेता सिंघल.
जिल्हाधिकारी,सातारा.