जिल्हाधिकाऱ्यांचे पाटणच्या तहसिलदारांना ” दे धक्का ” ; जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी पाटणच्या तहसिलदारांचे काढले अधिकार ; ‘ड्रायव्हर झाले तहसिलदार.’

पाटण :- पाटण तालुक्‍यात प्रांताधिकारी, तहसीलदार आणि नायब तहसीलदार व कर्मचारी यांच्यातील संघर्षामुळे तसेच नागरीकांच्या तक्रारी मुळे येथील तहसिल कार्यालयातील कामकाजाचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी पाटणच्या तहसिलदारांकडुन गौण खणिज, कुळकायदा व वतनी जमिनीच्या परवानगीचे अधिकार काढून घेतले आहेत. तसेच एकमेकांवर केलेल्या तक्रारींवरुन जिल्हाधिकाऱ्यांनी दोन नायब तहसिलदारांच्या बदल्याही केल्या आहेत. तहसिल कार्यालयातील वाढत चाललेल्या तक्रारी वरून जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी पाटणच्या तहसिलदारांचे मुख्य अधिकार काडून घेतल्याने पाटण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. तर पाटण तहसिल कार्यालयातील कारभारा बाबत जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली असल्याचे बोलेले जात आहे.
गौण खनिजा संदर्भात विटभट्टी, वाळू उपसा व वाहतुक तसेच बुरुम उत्खनण व वाहतुक आदी विषयावर पाटण तहसिल कार्यालय प्रचंड चर्चेत राहिले आहे. या विषयावरुन अनेक खल्लबत्ते उडाल्याची नागरीकांनी पाहिले आहेत. गौण खणिज, कुळकायदा व वतनी जमीनीच्या परवानगी व गौण खनिज उत्खनन करणाऱ्या वाहनांवर कारवाई करताना केलेली दिरंगाई तहसिलदारांना भोवली असल्याची चर्चा आहे.
तहसिलदार व प्रांताधिकारी यांच्यात समन्वय राहिला नव्हता. तहसिलदार व नायब तहसिलदारांतील वाद व मतभेद चव्हाट्यावर आला होता. त्यातुन नायब तहसिलदारासह कर्मचारी वारंवार दीर्घ रजेवर जाण्याचे प्रमाण वाढले होते. अधिकारी व कर्मचारी यांच्यात संवाद कमी झाल्याने कर्मचाऱ्यांनी राजीनामा देण्याचे प्रकार वाढले होते. कुळकायदा, वतनी जमिन यांच्या परवानगीसाठी खातेदारांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. त्यातच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकमेकांविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केलेल्या तक्रारींचा खच पडला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाला उशिरा का होईना कारवाईला सुरवात केल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी नायब तहसिलदार राजेश जाधव यांची सातारा मुख्यालयात व विजय माने यांची कराड प्रांताधिकारी कार्यालयात तडकाफडकी बदली केली आहे. पाटणच्या तहसिलदारांकडुन गौण खणिज, कुळकायदा व वतनी जमीनीच्या परवानगीचे अधिकार काढून घेतले आहेत. ते अधिकार प्रांताधिकारी श्रीरंग तांबे यांच्याकडे वर्ग केले आहेत.
पाटण महसूल विभागात गेल्या दीड वर्षांपासून अधिकारी व कर्मचाऱ्यातंर्गत मतभेद आहेत. वेळेत काम होत नसल्याने नागरीकांना हेलपाटे मारावे लागत आहेत. त्यामुळे वेळ व पैसा नाहक खर्च होत आहे. तलाठी व मंडलाधिकाऱ्यांकडुन सातबाऱ्यामध्ये झालेल्या चुका दुरुस्त करताना खातेदारांची दमछाक होत आहे. औनलाईन सात बारा कामाबाबत जिल्ह्यात पाटण तालुका सर्वात मागे असल्याने याचा हि त्रास नागरीकांना सोसावा लागत आहे.

 

तहसिलदारांचा ड्रायव्हर झाला तहसिलदार.

जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी पाटणच्या तहसिलदारांकडुन गौण खणिज, कुळकायदा व वतनी जमिनीच्या परवानगीचे अधिकार काढून घेतल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आसताना. आणि हे अधिकार प्रांताधिकारी यांना दिले आसताना दुसरीकडे मात्र तहसिलदारांच्या गाडीवरील ड्राव्हराकडून गौणखणिज, बुरुम वाहतुक, माती वाहतुक व वाळू वाहतुक करणाऱ्या वाहनांना आडवले जात असुन या वाहन चालक – मालकांच्यावर कारवाई करण्याचा धाक या ड्रायव्हराकडून दाखविला जात आहे. याच्या पाठीमागील गौडबंगाल समोर आणन्याची मागणी नागरीकांच्या कडून होत आहे.