सातार्‍याच्या तनिका शानभागचे निर्विवाद वर्चस्व

सातारा : जेव्हा तिच्या वयाचे विद्यार्थी दहावीच्या परीक्षेची तयारी करत आहेत, ती आपल्या 125 सीसी मोटारसायकलवरून मोटरक्रॉस शर्यतींमध्ये भाग घेऊन केवळ बक्षिसेचनाही तर प्रेक्षकांची मनेही जिंकत आहे. मोटरक्रॉस या साहसी आणि काहीसे पुरुषी वर्चस्व असणार्‍या खेळामध्ये तनिका शानभाग या नावाने स्वतःची वेगळी ओळख निर्माणकेली आहे. नुकत्याच पुण्यात झालेल्या पुणे इन्व्हिटेशनल सुपरक्रॉस या स्पर्धेत तिने एसएक्स जुनिअर या विभागात आपले निर्विवाद वर्चस्व सिध्द करून 114 गुणांसहविजेतेपद मिळविले. या विभागात सातार्‍याच्याच श्लोक घोरपडे याने तिला तगडा सामना दिला मात्र, 108 गुणांवर त्याला द्वितीय स्थानावर समाधान मानावे लागले.
पुणे इन्व्हिटेशनल सुपरक्रॉस या स्पर्धेच्या अनुभवाविषयी बोलताना तनिकाने सांगितले, स्पर्धेतील एकमेव महिला स्पर्धक असले तरी त्याचे कोणतेही दडपण मलाजाणवले नाही, किंबहुना या स्पर्धेत सहभागी होऊन मला आनंद झाला. यावर्षीच्या सुपरक्रॉस स्पर्धेचा ट्रॅक आव्हानात्मक असल्याने मोटारसायकल चालवायला मजा आली.
या साहसी खेळाकडे वळण्याची भूमिका स्पष्ट करताना तनिकाने सांगितले, माझ्या लहान भावासोबत एकदा सरावासाठी गेले असताना मी सहज मोटारसायकल हाताळलीआणि मला ट्रॅकवर मोटारसायकल चालवायला आवडली. मोटारसायकल सोबत हवेत भरारी घतल्यानंतर माझी अपघातांविषयी वाटणारी भीती निघून गेली आणि या खेळाचे मलाआकर्षण वाटू लागले. मागील एक वर्षापासून मी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेत आहे. ज्यावेळी मी स्पर्धेसाठी मैदानावर माझी यामाहावायझी 125 सीसी मोटारसायकल घेऊन उतरते त्यावेळी ती स्पर्धा आणि खेळ हेच माझ्यासाठी महत्वाचे असते. माझा सराव आणि अभ्यास, मला याच नियोजनामुळे संभाळणेशक्य होते.
या खेळाविषयी मुलींमध्ये फारशी उत्सुकता दिसत नाही याविषयी तनिकाने सांगितले, अनेकदा अपघातांच्या भीतीने मुली या खेळामध्ये सहभागी होण्याचे टाळतात. मात्रअपघातांची काळजी करण्याची गरज नाही, कारण अत्याधुनिक वैद्यकीय सेवांमुळे तुमची कोणतीही दुखापत लवकरात लवकर बरी होते. मैदानात उतरताना तुमच्या सुरक्षिततेचीसंपूर्ण काळजी घेतली जाते. जास्तीत जास्त मुली या खेळामध्ये सहभागी होणे गरजेचे आहे. केवळ एक महिला स्पर्धक म्हणून सुपरक्रॉस स्पर्धांमध्ये सहभागी होण्यापेक्षा, फक्तमुलींसाठीच आयोजित केल्या जाणार्‍या सुपरक्रॉस स्पर्धांमध्ये सहभागी व्हायला मला जास्त आवडेल.