कोयना सोसायटी व विलासपूरमधील नागरिक मुलभूत सुविधेपासून वंचित

जागोजागी कचर्‍याचे ढिग, दुर्गंधीने नागरिक हैराण, खराब रस्ता डाबरीकरणाच्या प्रतिक्षेत
साताराः सातारा शहरानजीक वसलेले कोयना सन्मित्र सोसायटी व विलासपूरमधील नागरिक अनेक दिवसापासून मुलभूत सुविधेची मागणी करत आहेत. परंतू त्याकडे संबंधीत विभागाने केलेल्या दुर्लक्षामुळे त्याचा नाहक त्रास स्थानिक रहिवासाना होत आहे. अनेक दिवसापासून या भागातले रस्ते खराब झाले आहेत. रस्त्यावरुन नागरिकाना व वाहनचालकाना प्रवास करणे धोक्याचे ठरु लागले आहे. खराब रस्त्यामुळे या मार्गावरुन प्रवास करणे कठीण झाले आहे. रस्त्याच्या डाबरीकरणाच्या प्रतिक्षेत असलेला या रस्तावर गेल्या अनेक दिवसापासून नुसतीच खड्डी येवून पडली आहे. तसेच जगदेव कार्नर ते पोलीस वसाहतीपर्यंतच्या रस्त्याकडेला असलेल्या खाब्यावरील दिवे बंद असल्याने या भागातील नागरिकाना रात्रीअपरात्री प्रवास करणे धोक्याचे ठरत आहे. त्याच या परिसरात वादळाने एक मोठा वृक्ष एका इमारतीवर पडलेला असून ते अद्यापही हटवला नाही. नागरिकाच्या नागरी समस्येकडे लक्ष पुरविणे गरजेचे असताना येथील संबंधीत यंत्रणा निष्क्रिय ठरत असलेचे दिसून येते आहे. या परिसरात पुर्ण अंधार असल्याने घरफोडीचे प्रमाण वाढलेले आहे. परिसरातील वाढती वसाहत पाहाता या ठिकाणी सुरक्षिततेची दक्षता घेण्याबरोबर नागरी सुविधा पुरविणे आवश्यक आहे. परिसरातील वाढत्या लोकसंख्या पाहाता या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची होणारी गैरसोय दूर होणे आवश्यक आहे. नागरिकांच्या मुलभूत प्रश्‍नाना प्राधान्यक्रम देण्यासाठी खा. श्रीमत छत्रपती उदयनराजे भोसले व आ. शिवेंद्रराजे भोसले यानी पुढाकार घ्यावा अशी नागरिकामधून मागणी होत आहे.
डोगराकडेला वसलेला या भागात सध्या बिबटयाचा वावर आहे. नागरिकांच्या सुरक्षितेच्या दृष्टीकोनातून परिसरातील विद्युत खंबावरील दिवे रात्रीच्या वेळी चालू असणे अत्यंत गरजेचे आहे. कोयना सोसायटी व विलासपूरमधील नागरिक नागरी सुविधेच्या प्रतिक्षेत आहेत. रस्ता, पाणी, लाईट या मुलभूत गरजा पुर्ण करण्यासाठी संबंधीत यंत्रणेने पुढाकार घेणे आवश्यक आहे.
कॅप्शन-कोयना सोसायटी व विलासपूर येथील झालेला  खराब रस्ता,  रस्त्याच्या कडेला  पडलेला कचरा