सातारा शहरातील सर्व रस्ते चांगले होण्यासाठी प्रयत्न करणार : आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले

सातारा : सातारा शहरात राजपथ, कर्मवीर भाऊराव पाटील पथ आणि राधिका रोड हे मुख्य तीन रस्ते आहेत. या तीनही रस्त्यांवर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. या तीन रस्त्यांवरील वाहतूकीचा ताण कमी होण्यासाठी शहरातील अंतर्गत रस्ते चांगले असणे आवश्यक आहे. प्रभाग क्र. 7 मध्ये नगरसेविका सौ. दिपलक्ष्मी नाईक यांच्या पाठपुराव्यातून अंतर्गत रस्त्यांचे नुतनीकरण होत आहे. यामुळे प्रभाग क्र. 7 लकच्या मुख्य रस्त्यांवरील वाहतूकीचा ताण कमी होण्यास मदत होईल असे मत व्यक्त करतानाच सातारा शहरातील सर्व रस्ते दर्जेदार आणि चांगले होण्यासाठी आपण प्रयत्न करु, असे आश्‍वासक प्रतिपादन आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
प्रभाग क्र. 7 मधील 76 मल्हार पेठ, जगताप कॉलनी, गिरीजा हॉस्पिटल ते डॉ. सुहास पोळ हॉस्पिटल मार्गे राधिका रोड या रस्त्याच्या खडीकरणाचा व डांबरीकरणाच्या शुभारंभप्रसंगी आ. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी विरोधी पक्षनेते अशोक मोने, नगरसेविका सौ. दिपलक्ष्मी नाईक, नगरसेवक अमोल मोहिते, शकील बागवान, रविंद्र ढोणे, राजू गोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रभागातील जेष्ठ नागरिक महंमद शेख यांनी विविध समस्या मांडल्या. सर्व समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाने तात्काळ पावले उचलावीत अशा सुचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी उपस्थित अधिकार्‍यांना केल्या. आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागात विविध विकासकामे केली जात आहेत. प्रभागातील सर्व अडचणी सोडवणे आणि नागरिकांना मुलभूत सुविधा पुरवण्यासाठी मी नेहमीच प्रयत्न करणार असल्याचे सौ. नाईक यांनी यावेळी सांगितले. उपस्थित नगरसेवक आणि अधिकार्‍यांचे व नागरिकांचे सौ. नाईक यांनी आभार मानले.
यावेळी अ‍ॅड. धनंजय चव्हाण, अ‍ॅड. धीरज शिंदे, डॉ. सुहास पोळ, डॉ. सौ. अंजली पाटील, जयसिंग दळवी, ज्ञानेश्‍वर घार्गे, डॉ. शकील आतार, शमशुद्दीन लांडगे, सावळातात्या पवार, जीवन भोसले, इथापे, शिवाजीराव पवार, प्रा. आर.जी. पाटील, प्रा. विजयकुमार घोडके, प्रा. दीपक कांबळे, चंद्रकांत धनवडे, सौ. मंगला भोसले, दिपक चव्हाण, जितेंद्र माने, श्रीमती गुरवे, अमोल जाधव, गणेश नाईक, नितीन महाडीक यांच्यासह मल्हार पेठ व प्रभाग क्र. 7 मधील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
प्रभाग क्र. 7 मधील अंतर्गत रस्त्याच्या डांबरीकरणाच्या शुभारंभप्रसंगी आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, अशोक मोने, सौ. दिपलक्ष्मी नाईक, नगरसेवक व नागरिक.