खटाव माणच्या पूर्वभागाला टेंभूचे पाणी मंजूर ; डॉ. दिलीप येळगावकर यांची माहिती

सातारा : सन 1995 पासून विधानसभेच्या बाहेर मुंबई उच्च न्यायालयात तसेच महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण मुंबई यांच्याकडे सातत्याने लढा देवून सातारा जिल्ह्यावर व पर्यायाने दुष्काळी खटाव माण तालुक्यावर झालेला अन्याय दूर करण्याचा मी प्रयत्न केला यामध्ये आ. प्रभाकर घार्गे व अ‍ॅड. दिलीप बोडके कातरखटाव यांनी त्यावेळी मला फार मोठी मदत केली होती. सन 2014 पर्यंत सर्व निकाल सातारा जिल्हा व खटाव माणच्या बाजूने मिळवून ही तत्कालीन काँग्रेस राष्ट्रवादी सरकार व सातारा जिल्ह्यातील दोन्ही जलसंपदा मंत्र्यांनी जिल्ह्याला व खटाव माणला न्याय दिला आहे. अशी माहिती माजी आ. डॉ. दिलीपराव येळगावकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
ना. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकार मधील आमचे नेते चंद्रकांत पाटील यांनी अत्यंत कठोर निर्णायक मूमिका घेवून खटाव तालुक्यातील मायणी परिसरातील 16 गावे व माण तालुक्यातील शेनवडी, वरकुटे परिसरातील 16 गावांना टेंभूचे पाणी देण्याबाबत अतिशय महत्वपूर्ण निर्णय केलाा व या कामासाठी येणार्‍या खर्चासाठी मदत व पुनर्वसन खात्याकडून नउ कोटी पाच लाख पेक्षा जास्त रक्कम धाडसाने मंजूर केली. यासाठी सातारा जिल्ह्यातील माण, खटाव तालुक्यातील दुष्काळी जनता त्यांच्या कायम ऋणात राहील व त्यांचे व या सरकारचे अतिशय मनपुर्वक आभारी आहे.
टेंभू योजनेला माझ्या आग्रहामुळेच महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने ठिेबक सिंचन हा कायदा लागू केला. सध्या असलेल्या प्रकल्पामध्ये केवळ टेंभू योजनेला हा कायदा लागू झाला आहे. केंद्र सरकारने नेमलेल्या कृष्णा पाणी तंटा लवाद 2 अन्वये महाराष्ट्राला जे जादा पाणी कृष्णा नदीचे मंजूर झाले आहे. त्यातील जास्तीत जास्त पाणी सातारा जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात आणून या भागावर असलेले आसमानी संकट व काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारचे सुलतानी संकट दूर करणे हा माझ्या लढ्याचा पुढचा भाग राहणार आहे. व यासाठी राज्याचे व केंद्रातील भघजप सरकार तसेच ना. नितीन गडकरी, ना. देवेंद्र फडणवीस, ना. चंद्रकांत पाटीील, गिरीश महाजन, विजय शिवतारे तसेच जिल्ह्यातील राज्यातील व केंद्रातील भाजपचे नेते व दुष्काळी तालुक्यातील जनता व  आपण सर्व पत्रकार माझ्या कायम पाठीशी राहतील याची खात्री आहे.
जिहे कठापूर उरमोडी व टेंभू उपसा या सर्व योजनेचे पाणी दुष्काळी भागात लवकरात लवकर आणण्यासाठी मी जिवाचे रान करणार आहे. या कामात ज्यांनी ज्यांनी मला सहकार्य केले त्या ज्ञात अज्ञात व्यक्तींना धन्यवाद देतो.
पत्रकार परिषदेत सातारा जिल्हा सेक्युरिटी कार्डचे अध्यक्ष अभिजीत येळगावकर, राजाराम जाधव उपस्थित होते.