माण खटावला वरदान ठरणार्‍या पाणीयोजना विद्यमान सरकारच्याच : चंद्रकांत जाधव

म्हसवडः माण खटाव तालुक्याला वरदान ठरणा-या पाणी योजना या शिवसेना भाजप सरकार राबवत आहे त्यासाठी निधीची ही तरतूद आपलेच सरकारने करत आहे मात्र तालुक्यातील लोकप्रतिनिधी व विरोधी पक्ष या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये हे श्रेय हे शिवसेना भाजप चे आहे असे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हा प्रमुख चंद्रकांत दादा जाधव यांनी केले ते म्हसवड येथे नुतन पदाधिकारी व सभासद नोंदणी अभियान कार्यक्रमात बोलत होते
हिंदूह्रदयसम्राट स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त म्हसवड शिवसेना शाखेच्या वतीने सभासद नोंदणी अभियान राबविण्यात आले यावेळी जाधव बोलत होते.यावेळी ,माण खटाव संपर्क प्रमुख शंकरभाई विरकर, माण तालुका प्रमुख बाळासाहेब मुलाणी, रामभाऊ जगदाळे, खटाव तालुका प्रमुख युवराज पाटील, म्हसवड विभाग प्रमुख शिवदास केवटे, शहर प्रमुख राहूल मंगरूळे,म्हसवड युवा सेना प्रमुख सोमनाथ कवी, ग्राहक सरंक्षण कक्ष उपशहर प्रमुख अदित्य सराटे, आदी उपस्थित होते
यावेळी बोलताना जाधव पुढे म्हणाले तालुक्यातील होत असलेल्या विकास कामाचे श्रेय घेण्याची स्पर्धा सद्या तालुक्यातील विरोधी पक्षात सुरू आहे मात्र केंद्रात व राज्यात युतीचे सरकार असुन हे सर्व विकासकामे आपलेच सरकार करत आहे मात्र या तालुक्यात विरोधी पक्षाचा आमदार आहे त्यासाठी तालुक्याचा आणखी विकास करायचा असल्यास या तालुक्याचा आमदार हा शिवसेनेचा झाला पाहीजे त्यासाठी सर्व पदाधिकार्‍यांनी व सभासदानी पक्ष वाढीसाठी प्रयत्न करावा शिवसेना प्रमुख उध्दवजी ठाकरे यांनी प्रत्येक जिल्ह्याला अडीच लाख सभासद नोंदणी चे उद्दीष्ट दिले आहे आज या नविन वर्षाच्या सुरवातीलाच माण तालुका शिवसेना सभासद नोंदणीला प्रतिसाद पाहता आपण हे उद्दीष्ट नक्कीच पुर्ण करू शिवसेना हा शिस्तीवर चालणारा पक्ष आहे सर्व नुतन पदाधिकारी व सभासदानी संघटनेचे काम प्रामाणिक पणे करावे असेही ते म्हणाले
यावेळी बोलताना शंकरभाई विरकर म्हणाले गाव तिथे शाखा व घर तिथे शिवसैनिक हा स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा अजेंडा होता आज म्हसवड भागातील सभासद नोंदणी साठी शिवसैनिकांचा प्रतिसाद पाहता येणा-या काळात गाव तेथे शाखा व घर तेथे शिवसैनिक होण्यास वेळ लागणार नाही
यावेळी बोलताना उपजिल्हाप्रमुख संजय भोसले म्हणाले सद्या म्हसवड मधील शिवसेनेचा मीच नेता आहे असे काहीजण म्हणत आहेत पण शिवसेना कोणाची मक्तेदारी नाही शिवसेना हि स्व बाळासाहेब ठाकरे यांची आहे त्यामुळे शिवसैनिकांनी कोण्या कुडमोड्या जोतिषाच्या मागे न जाता बाळासाहेबाच्या शिवसेनेच्या पाठीशी राहावे
यावेळी प्रस्ताविकात तालुका प्रमुख बाळासाहेब मुलाणी यांनी तालुक्यातील विखुरलेल्या शिवसैनिकांची मोठ बांधुन शिवसेना पुन्हा तेवढ्याच ताकदीने उभी करणार असल्याचे सांगितले
यावेळी नुतन पदाधिकारी यांना नियुक्ती पत्रे देण्यात आली यात म्हसवड विभाग प्रमुख शिवदास केवटे, उपशहर प्रमुख सचिन भोकरे, मुन्ना काझी प्रभाग शाखा प्रमुख अमर भागवत, आप्पा लोखंडे, धनाजी कलढोणे, सिध्दनाथ गुरव, अमोल पिसे, गजानन ढगे, संतोष मंगरूळे , सतिश विरकर, साई धुमाळ, जयसुर्या सोनवणे, काका शिंदे, आदीची नियुक्ती करण्यात आली यावेळी समिर जाधव, अंकुश नलवडे, हर्षद शेख, अमित कुलकर्णी, शरद गोरड, सुभाष काटकर, दगडू जगदाळे, आदी कार्यकर्ते हजर होते यावेळी म्हसवड व परिसरातील बहुसंख्य शिवसैनिक उपस्थित होते.