फलटण : राज्यातील साखर कामगारांच्या बोनसबाबत एकसुञता रहावी,कायमस्वरुपी धोरण ठरविण्यासाठी लवकरच मुख्यमंत्री,सहकारमंञी,साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे पदाधिकारी समवेत बैठक घेण्याची ग्वाही खा.शरद पवार यांनी दिल्याची माहिती न्यु फलटण शुगर वकर्सचे चेअरमन तथा फलटण तालुका कामगार युनियनचे अध्यक्ष प्रल्हादराव साळुंखे पाटील यांनी दिली.
राष्ट्रवादी कॉग्रेसचे सर्वेसर्वा खा.शरद पवार यांच्या गोविंद बाग,बारामती येथील निवासस्थानी न्यु फलटण शुगर वकर्सचे चेअरमन साखर कामगारांचे नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील,प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे,युवराज रणवरे,राजेंद्र तावरे यांनी बोनस प्रश्नी खा.पवार यांची भेट घेऊन चर्चा केली.त्यानंतर खा.पवार यांनी वरीलप्रमाणे बैठक घेऊन या प्रश्नाची सोडवणूक करण्याचे सुतोवाच केले.साखर उद्योगामध्ये शेतकर्यांप्रमाणेच साखर कामगारही महत्वाचा घटक असल्याने ऊस दराप्रमाणेच कामगारांचा बोनस व अन्य प्रश्नाबाबत कायम स्वरुपी एकच सुत्र ठरवावे अशी मागणी यावेळी करण्यात आल्याचे प्रल्हादराव साळुंखे पाटील यांनी सांगितले.
साखर कामगारांचे प्रश्न आपल्याला माहित आहेत.साखर कारखानदारांनाही याप्रश्नी विश्वासात घ्यावे लागणार आहे.शासनाने पुढाकार घ्यावा यासाठी पुढाकार घेणार असल्याचे खा.पवार यांनी स्पष्ट केले.
साखर कामगारांच्या बोनसबाबत मुख्यमंत्र्यांची बैठक घेणार : खा. शरद पवार
RELATED ARTICLES