दुचाकी चोरणार्‍या त्रिकुटाच्या टोळीला अटक

साडे सहा लाख रुपयांचा ऐवज ताब्यात
म्हसवड : म्हसवड व परिसरात दुचाकी चोरट्यांनी धुमाकूळ घालून दुचाकी मालकांना बेजार करणार्‍या त्रिकुटांचा पडदा पाश केला असून तीन बुलेट व पाच मोटार सायकल आणि एक अ‍ॅक्टीव्हा स्कुटी असा साडे सहा लाख रुपये किंमतीच्या दुचाकी चोरुन दुसर्‍याला विकणारे दोन अल्पवयीन व एक तरुण अशा त्रिकुटाच्या टोळीला म्हसवड पोलिसानी सापळा रचुन ताब्यात घेतल्याने दुचाकी मालकांना सुटकेचा श्वास सोडला असून या धडाकेबाज कारवाईमुळे म्हसवडचे सपोनि मालोजीराव देशमुख व त्यांच सहकार्याचे अभिनंदन केले जात आहे.
याबाबत म्हसवड पोलिस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी, म्हसवड आटपाडी, दिघंची, दहिवडी, हद्दीतील अनेक मोटार सायकली चोरीच्या घटना पोलिस ठाण्यात दाखल असुन मोटारसायकल चोरी करुन दुसर्‍या जिल्हात नंबर प्लेट बदलून विकणल्याने चोरीच्या गाड्या सापडत नव्हत्या वा चोरटे ही सापडत नव्हते प्रत्येक वेळी चोरटे गुंगारा देवून पळून जाण्यात यशस्वी होत होते मात्र पोलीस हवालदार अभिजित भादुले यांनी अनेक ठिकाणी पोलिस खबर्‍याच्या सहकार्याने तपासाला गती दिली होती दोन दिवसा पूर्वी खबर्‍याकडुन मोटारसायकल चोरट्यांची अचुक माहिती मिळाल्या नंतर शनिवार दि. 5 जानेवारी रोजी रात्री उशीरा पर्यती येथे सपोनि मालोजीराव देशमुख पोलिस हवलदार अभिजित भादुले, राहुल कुंभार, नितीन धुमाळ, विजय कवडे, राहुल मदने, किरण चव्हाण, विकास कुराडे, दुभळे, यांनी सापळा रचुन राहत्या घरातुन समाधान शत्रुघ्न नरळे, प्रविन नवनाथ नरळे रा. पर्यंती, ता. माण यांना ताब्यात घेतले व पोलिसी हिसका दाखवताच त्याने आणखी दोन साथीदारांची.नावे सांगून अकलुज येथे आहेत असे सांगितले.
आज रविवारी पहाटे म.गांधी चौकात वेळापुर रोड हायस्कूलच्या मागे असलेल्या घराला पोलीस पथकाने वेडा देवून प्रकाश रामचंद्र चोरमले (बबन मोरे) वय 23 रा पाटील वस्ती, अकलुज याला ताब्यात घेवून चौकशी केली आसता चोरमले यांने मोटारसायकल चोरल्याचे कबुल केले व चोरलेल्या तिन बुलेट दोन मोटारसायकल व एक अ‍ॅक्टीव्हा असल्याचे सांगुन एक म्हसवड येथून चोरलेली मोटारसायकल जळबावी घाटात तेल संपले म्हणून सोडून दिली तर दुसरी अकलुज येथे अपघात झाला म्हणून टाकून दिली तिसरी ही इंदापुर येथे अपघात झाला म्हणून सोडून दिल्याचे कबुल केले.
नव्या वर्षाच्या प्रारंभीच म्हसवड पोलीस ठाण्याच्या या मोटारसायकल चोरट्यांना जिल्हा पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, पोलिस उपविभागीय अधिकारी अनिल वडनेरे यांचे मार्गदर्शनाखाली, सपोनि मालोजीराव देशमुख यांनी सापळा रचुन तिन मोटार सायकल चोरट्याना जेरबंद करण्यात यश मिळल्याने अनेक स्थरातुन पोलिसांचे अभिनंदन होत आहे.