अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्दच करावा, खासदार उदयनराजे आक्रमक

पुणे : अ‍ॅट्रोसिटी कायद्यात बदल नव्हे, तर तो रद्दच झाला पाहिजे, असं म्हणतानाच अ‍ॅट्रोसिटीच्या 90 टक्के केसेस बोगस असतात, असा दावाही उदयनराजेंनी केला आहे.

कोण काय म्हणालं याच्याशी मला देणंघेणं नाही, असा टोलाही त्यांनी यावेळी शरद पवारांना लगावला. पवारांनी अ‍ॅट्रोसिटी कायद्यात बदल करण्याचं सुचवलं होतं, त्याबाबत प्रश्न विचारला असता, उदयनराजेंनी उत्तर दिलं.

मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, अशी मागणीही उदयनराजे भोसलेंनी केली. 11 तारखेला सातार्‍यात होणार्‍या मराठा समाजाच्या मोर्चात उदयनराजे भोसले सहभागी होणार आहेत.