स्वातंत्र्य हे आपल्या विचारांचे असायला हवे : उर्मिला मातोंडकर

जिल्हा पोलीस दलाच्या वतीने निर्भया पथकाचा शुभारंभ
सातारा : स्वातंत्र्य दिन आपण नुकताच साजरा केला. स्वातंत्र्य हे आपल्या विचाराचे असायला हवे, आपल्या जन्मही महाराष्ट्रात झाला आहे हे आपले भाग्य मानायलाच हवे,अ से प्रतिपादन प्रसिद्ध सिनेअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी केले.
सातारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने निर्भया पथकाचा शुभारंभ आज पोलीस करमणुक केंद्र अलंकार हॉल येथे करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे – पाटील, जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप पाटील, जिल्हाधिकारी आश्‍विन मुद्गल, उपविभागीय पोलीस अधिकारी राजलक्ष्मी शिवणकर, आ.वैशाली चव्हाण, चित्रलेखा माने – कदम, श्रीमती चेतना सिन्हा यांची विशेष उपस्थिती होती.
पुढे बोलताना अभिनेत्री उर्मिला मातोंडकर म्हणाल्या, मी संपूर्ण जग फिरल्यानंतर सातार्‍यात आले असली तरी माझा पाचगणी येथे बंगला आहे. यामुळे मी सातारा जिल्हयाची रहिवाशी आहे. मुलींच्या छेडछाडीच्या घटना आज सर्वत्र घडत आहे. मात्र स्वत:ची सुरक्षा स्वत:च ठेवण्यासाठी मुलीनी निर्भय बनायला हवे. मुलीवर अत्याचार झाल्यानंतर त्याची माहिती ती आपल्या आई, वडिलांजवळ तातडीने देईल याीच शक्यता कमी असते, जोपर्यंत मुली निर्भर होत नाहीत तोपर्यंत समाजाकडून अत्याचारात वाढच होत राहील. ती राजकीय नेते नसल्यामुळे एक साधी अभिनेत्री म्हणून तुमच्याशी शेअर करू शकले. सातार्‍यात येवून कंदी पेढ्याचाही आस्वाद घेतला.
विशेष पोलीस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे – पाटील म्हणाले, आज स्त्री सुरक्षित राहिली तर समाज सधारूकतो. स्त्रीला बागडायला व खेळण्यास स्वतंत्र्य द्यायला हवे. राज्यात 23 हजार 93 महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडल्या. महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे रोखावेत म्हणून निर्भया पथकाची स्थापना केली. पोलीस दलात काम करणार्‍या महिलांचा यात समावेश केला आहे. वाई येथील डॉ.
संतोष पोळ याने तब्बल सहा महिलांचे खून हे आर्थिक देवानघेवाणीतून केले आहेत. या घटनेत आरोपीने वेगवेगळी अमिषे दाखवून महिलावर अन्याय अत्याचर केले पण अखेर त्याचा पापाचा घडा भरल्यानेच पोलिसाच्या हाती लागला. आता तर चौंदा सेकंद एका महिलेकडे सातत्याने पहिले तर तो गुन्हा समजून आरोपीला अटक करावी असे निर्देश मुंबईचे पोलीस महासंचालकांनी दिले आहेत. जोपर्यंत महिला सुरक्षित राहात नाहीत, तोपर्यंत आपणाला वर्दी घालण्याचा अधिकार नाही अशी भावना पोलीस अधिकारी, कर्मचार्‍यांनी ठेवायला हवी. आज 15 ते 25 वयोगातील मूलांकडून छेडछाडीच्या घटना होत आहेत. यासाठी मुलांच्यावर समुउपदेशन घेणे तितकेच गरजेचे आहे. गृहमंत्र्यांसमवेत आमची बैठक झाली असून छेडछाड रोखण्यासाठी आता कठोर पाऊले उचलण्याचीच गरज आहे. निश्‍चितच यापुढे निर्भया पथकातील अधिकारी, कर्मचारी हे काम करतील. स्त्रीची गर्भातच हत्या केली जात आहे. यामुळे दरहजारी मुलीचे जन्माचे प्रमाण 930 पर्यंत खाली आहे. 30 टक्के महिला या पोलीस दलात आहेत, यामुळे महिला पोलीस कर्मचारी पिडीतांना निश्‍चित न्याय मिळवून देतील.
पोलिस अधीक्षक संदीप पाटील म्हणाले, सातारा हा देशाला व महाराष्ट्राला दिशा देणारा जिल्हा आहे. या जिल्ह्यातून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचीद्वारे महिलांना खुली केली. निर्भया पथक छेडछाडीवर लक्ष ठेवणार आहे. गाव पातळीवर समिती गठीत करुन ही समिती पोलिसांना उपद्रवी लोकांची नावे देणार आहे. छेडछाडीची घटना घडल्यानंतर पिडीत मुलीने आरोपीचे नाव लिहून सिलबंद असलेल्या पेटीत तक्रार टाकली तर त्याची दखल घेतली जाईल. पोलिस मित्राच्या माध्यमातून अशा घटनांना प्रतिबंध द्यायला जाईल.
जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्गल म्हणाले, जिल्हा पोलिस दलाने निर्भया पथकाच्या माध्यमातून छेडछाडीच्या घटना घटू नयेत यासाठी सुरु केलेला उपक्रम चांगला आहे. पूर्ण कोल्हापूर परिक्षेत्रात हा उपक्रम सुरु आहे. 50 टक्के यामुळे जनतेमध्ये विश्‍वास निर्माण होणार आहे. व्हॉटस्अ‍ॅप, ई-मेल, फेसबुकच्या माध्यमातून उपडेट ठेवता येणार आहेत.
यावेळी वाठार येथील घटनेच्या अनुषंगाने पिडीत मुलीच्या कुटुंबाला आर्थिक मदत केल्याबद्दल चेतना सिन्हा, रंजना रावत, शहर पोलिस ठाण्याचे पो. नि. बी. आर. पाटील यांना मान्यवरांच्या हस्ते ऋणनिर्देश पत्र देवून सत्कार केला. याप्रसंगी सौ. स्मिता हुलवन यांनी आपले विचार विचार व्यक्त केले.
प्रास्तविक पोलीस उपअधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर यांनी केले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.