वरुण यज्ञ करुन म्हसवड येथे कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग


म्हसवडः  वरुण यज्ञ करुन म्हसवड येथे कृत्रिम पाऊस पाडण्याच्या प्रयोग प्रख्यात संशोधक श्रीहरी उर्फ राजा मराठे यांनी यशस्वी करुन दाखविला. या प्रयोगाने म्हसवड परिसरात पावसाच्या धारा बरसु लागल्या.
माण तालुक्यात यंदा पावसाने दडी मारल्यामुळे खरीप हंगामातील पिकांच्या पेरण्या रेंगाळल्या पाऊस पडेल या अपेक्षेने ज्या गावाच्या शेतशिवारात शेतक-यांनी धुळफेक पेरण्या केल्या आहेत तेही पिके पुरेशा पावसा अभावी कोमेजुनच गेली आहेत.
आकाशी काळेकुठ्ठ ज्या वेगाने येत आहेत त्याच वेगाने पुर्वेकडे जात आहेत पाऊस काही पडत नाही ऐन पावसाळ्यात म्हसवडसह इतर गावचेही माण नदीचे पात्र कोरडेच राहिले आहे.परिणामी विशेत: माणच्या पुर्व म्हसवड भागात पाणी टंचाई समस्या तीव्र होऊ लागली आहे.
आकाशातुन वाहत जाणारे पाऊस सदृष्य असे काळे ढग आडवुन ते बरसण्यास भाग पाडण्यास शास्त्रीय आधारावरील वरुण यज्ञ  करण्याचा मनोदय माणदेशी फाउंडेशनच्या अध्यक्षा श्रमती चेतना यांनी केला व माणदेशी फाउंडेशनच्या माध्यमातुन माण तालुक्यात गावोगावी ग्रामस्थांच्या सहकार्याने हा उपक्रम राबिण्यास पुणे येथील तज्ञ श्रीहरी उर्फ राजा मराठे यांना म्हसवड येथे निमंत्रित करण्यात आले.
श्री.मराठे यांनी वरुण यज्ञ  प्रज्वलीत करताच काल सकाळी या प्रयोगास समाधान कारक यश आले व  काही अवधीतत पावसाची बरसात सुरु झाली व काल दिवसभर अधुन- मधुन पावसाच्या सरी पडतच राहिल्या.या वरुण यज्ञ विषयी माहिती सांगताना श्री.मराठे म्हणाले की,पावसासाठी हा यज्ञ उपक्रम अंधश्रघ्दा नव्हे, तर तो शास्त्रिय कारणावर आधारित आहे. लँगम्युअर चेंज रिअँक्शन म्हणुन हा प्रयोग परिचित आहे.आकाशात ढग ये जात असतात काही वेळा ते टिकुनही जागचे जागी राहतात आता नक्की पाऊस पडेल असेच आकाशी वातावरण निर्मिती होते परंतु: पाऊसच पड़ नाही शेतक-यांची निराशा होते. पावसाळा संपुन जातो व दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागतो. सन 1948 मध्ये नोबल पारितोषिक विजेता लँगम्युअर या शास्त्रज्ञाने चेंज ऑफ रिअँक्शन प्रयोगात  मिठाचा वापर करुन  पाऊस पाडता येतो हे तत्काली सिध्द करुन दाखवलं होतं परंतु या प्रयोगापासुन समाज दूर राहिल्याने परिणामी दुष्काळाच्या संकटास सामोरं जावं लागलं.या प्रयोगाचा कोणी पुरेसा फायदा करुन घेतला नाही.
हाच प्रयोग मी राज्यभर राबवित आहे व त्यास समाधानकारक यशही आले आहे.अनेक गावात वरुण यज्ञ करुन पाऊस पाडुन दाखविलेला आहे.या वरुण यज्ञ तंत्रज्ञान बाबतची शास्त्रिय माहिती देताना ते सांगतात हवेतील बाष्प एकत्रित येऊन पावसाचा थेंब बनण्यासाठी एकाद्या लहानशा कणाची आवश्यक्ता असते.
यज्ञातील तज्ञ श्री मराठे माहिती सांगताना म्हणाले,ढगाच्या सुक्ष कणावर बाष्प जमा होते.त्याचा आकार वाढला की पावसाचा थेंब तयार होत असतो.पाणी शोषुन घेणे हा मिठाचा गुणधर्म आहे.मिठात पाण्याचा थेंब आकृष्ट करण्याची शक्ती आहे. वरुण यज्ञात मिठाची भुमिका अत्यंत महत्वाची आहे.मिठ पेटत्यी यज्ञात वरचेवर टाकताच त्याचे कण धुरासोबत उंच आकाशी उडत जातात व ते ढगातील पाण्याचे कण शोषुन घेतात व त्याचे पाण्याच्या थेंबात त्वरीत रुपांतर करता व पाऊस पडण्यास सुरवात होते.या प्रयोगासाठी आकाशात पुरेशा प्रमाणात ढग असणे गरजेचे आहे.
विमानाने कृत्रिम पाऊस पाडण्याचा हा प्रयोगही असाच आहे परंतु तो खर्चिक आहे.वरुण यज्ञ हा प्रयोग खर्चिक नाही.आता पर्यंत हजारो गावात हा प्रयोग यशस्वी केलेला आहे.गावोगावच्या तरुणांनी या हा प्रयोग करण्यास योगदान दिले तर दुष्काळाचा सामना करावाच लागणार नाही व शेतकरी आत्महत्या प्रकारही थांबु शकतील असा दावा श्री.मराठे यांनी केला असुन या ऑगष्ट महिन्यातच अनेक गावात हा वरुण यज्ञ प्रयोग करुन दाखविलेला आहे.
माण तालुक्यामधील गावोगावी लोकसहभागातु जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांनी केलेली आहेत.आता सर्वांनाच पावसाची प्रतिक्षा आहे.माण मील प्रत्येक गावातील तरुणांनी हा वरुण यज्ञ प्रयोग करावा असे आवाहन श्रीमती चेतना सिन्हा यांनीही केले आहे.

चौकट-वरुण यज्ञ करण्यासाठी फार मोठा खर्च नाही. गावातील पटांणात कुंडा सारखा खड्डा घ्यावा या खड्या भोवती संरक्षण भिंतसारखे विटांचे कवच कराने जेणेकरुन कुंडातील आग इतरत्र पसरणार नाही.या कुंडात ओली लाकडे,सुका कचरा,काडी कचरा झाडाच्या फांद्या जुने टायर आदी टाकावे व पेटवावे जाळ लागताच त्यामध्ये चिक असणा-या पिंपळ,वड,रुई झाडांच्या फांद्या टाकुन मंतर एक पोते मोठे मिठ वरचेवर टाकावे.आगीत विरघळलेले मिठ धुराच्या साह्याने इंच आकाशी असलेल्या ढगात मिसळते व त्यातील मीठ ढगातील पाणी शोषुन घेते व पाऊस पडु लागतो.

(छाया:विजय भागवत,म्हसवड)