पाटील कुटुंबियांना वर्धन अ‍ॅग्रोकडून सव्वा लाखाची मदत

औंध: वर्धन अ‍ॅग्रोचे कर्मचारी चिखलहोळ ता.खानापूर येथील कै.धनाजी पाटील यांच्या आकस्मित निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. त्यामधून सावरण्यासाठी आपूलकीच्या मदतीसह भरीव आर्थिक मदत देण्याची जबाबदारी कुटुंब वात्सल्य घटक म्हणून वर्धन साखर कारखान्यातर्फे सव्वा लाख रुपयाचा धनादेश कारखान्याचे कार्यकारी संचालक विक्रमशील कदम व संचालिका तेजस्विनी कदम यांचे हस्ते सुपूर्द करण्यात आला.
वर्धन अ‍ॅग्रो प्रोसेसिग लि त्रिमली (ता.खटाव) कारखान्याचे उत्पादन विभागातील पॅन इनचार्ज कै.धनाजी तुकाराम पाटील यांचे अकस्मित दुःखद निधन चिखलहोळ येथे झाले होते.
मात्र बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीव्दारे समाजाला आदर्श घालून देणारे पुसेसावळी येथील माजी उपसभापती कै.डी.पी.नाना कदम यांच्या सुपूञांनी आजही अविरतपणे जोपासलेला आहे.
संस्थापक अध्यक्ष धैर्यशील कदम व त्यांचे बंधु विक्रमशील यांनी कारखाना व्यवस्थापनाचे वतीने त्याचे कुटुंबीयांना मदतीचा हात म्हणून एक लाख 25 हजार रूपयांचा धनादेश पाटील कुटुंबीयांकडे सुपूर्द केला. संचालक विक्रमशिल कदम व संचालिका तेजस्वीनी कदम वर्धन कारखाना सदैव आपल्या पाठीशी उभा राहील असे आश्वासन पाटील कुटुंबीयांना दिले.यावेळी चिफ इजिनिअर सतिश पिसाळ,चिफ केमिस्ट चंद्रकात धर्मे,ई.डी.पी. मँनेजर चंद्रकांत खराडे,लेबर ऑफिसर रणजीत चव्हाण,व कर्मचारी उपस्थित होते.