वास्तु प्रदर्शन रचना 2019 च्या स्टॉल बुकींगला उत्स्फूर्त प्रतिसाद

सातारा ः सातारा शहर व जिल्हाच नव्हे तर संपूर्ण पश्‍चिम महाराष्ट्र ज्याची आतुरतेने वाट पाहत असतो असे बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, सातारा सेंटरतर्फे आयोजित रचना – 2019 हे बांधकाम क्षेत्राशी निगडीत भव्यदिव्य प्रदर्शन जिल्हा परिषद मैदान, सातारा येथे सकाळी 10.00 ते रात्री 9.00 पर्यंत. दि. 7, 8, 9 व 10 फेब्रुवारी 2019 यावेळी आयोजित केले आहे. या वास्तु प्रदर्शनाचे स्टॉल बुकींग सध्या सुरू असून स्टॉल बुकींगसाठी संपुर्ण सातारा जिल्हा व अन्य जिल्ह्यांमधून मोठा प्रतिसाद मिळाला असून एकूण 101 स्टॉल्स पैकी 90 टक्के स्टॉल बुकींग झाले असून उर्वरीत स्टॉल बुकींग साठी त्वरा करा व आजच आपला स्टॉल बुक करा असे आवाहन बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया सातारा शाखेतर्फे करण्यात आले आहे.
आपल्या स्वप्नातील घर शोधणार्‍या, तसेच रिअल ईस्टेट क्षेत्रात गुंतवणूक करून आपल्या पैशाचा योग्य मोबदला घेऊ इच्छिणार्‍यांसाठी हे प्रदर्शन म्हणजे एक सुवर्ण संधीच ठरते. रचना – 2019 हे प्रदर्शन म्हणजे केवळ बांधील इमारतीची खरेदी -विक्री करण्याचे केंद्र नसून आपल्या घरासाठी लागणारे इंटेरिअर डिझाईन मटेरिअल, मार्केटमध्ये येणारे नव नविन तंत्रज्ञान, प्लंबींग, किचन, गार्डन्स साठी लागणार्‍या अनेक आकर्षक संकल्पना या सर्वांची एकाच ठिकाणी मिळण्याची केलेली ही परिपूर्ण व्यवस्था. या प्रदर्शनात 101 स्टॉलस् उभारले जाणार असून बिल्डर्स प्रोजेक्टस्, किचन इक्विपमेंटस्, इलेक्ट्रिकल अ‍ॅसेसरी, इनोव्हेटिव्ह बिल्डिंग मटेरिअलस्, स्विमिंग पुलस्, गार्डन, फिटनेस, इक्विपमेंटस् अशा विविध पर्यायांनी हे प्रदर्शन परिपूर्ण असेल. रचना 2019 यामध्ये स्टॉल बुकींग साठी रचना ऑफिस राजसी शॉपींग मॉल, बीएसएनएल ऑफिस समोर पोवई नाका , सातारा येथे संपर्क साधावा.