शिवसेनेच्या दणक्याने दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना मिळाला न्याय, विद्यार्थ्यांना मिळणार मोफत पास

पुसेगाव: दुष्काळ ग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मोफत पास देण्याची घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी करूनही वडुज,कोरेगाव आगाराकडून कसलीच आमलबजावणी करण्या आली नव्हती. शिवसेना कोरेगाव विधानसभा मतदासर संघाचे नेते तथा उपजिल्हा प्रमुख प्रताप जाधव आणि शिवसैनिकांनी वडूज आगार याठिकाणी आंदोलनाचे हात्यार उगारताच एस.टी प्रशासनाच जाग आली आणि प्रलंबीत प्रश्नाला न्याय मिळाला.
यावेळी आंदोलनावेळी खटाव तालुका प्रमुख दिनेश देवकर,महिपती डांगरे, कोरेगाव तालुका प्रमुख सचिन झांझुर्णे , सातारा शहर प्रमुख बाळासाहेब शिंदे, कोरेगाव शहर प्रमुख अक्षय बर्गे, जोतिराम गवळी, सुरज जाधव, कट्टर शिवसैनिक सचिन गवळी,पुसेगाव शहर प्रमुख आकाश जाधव यांच्यिसाह शिवसैनिक आणि विद्यार्थी विद्यार्थ्यीनीं मोठ्या संख्येने उपश्चित होते
यावेळी प्रताप जाधव म्हणाले, आदरणीय परिवहनमंत्री रावते साहेब यांनी दुष्काळी जनतेला आधार म्हणून विध्यार्थींना मोफत पास जाहीर केला जेणेकरून दुष्काळाच्या झळा सोसणार्या कुटूंबाला तेवढाचआधार होईल परंतू याचे यंत्रणेला गांभीर्य दिसत नाही वरचेवर माहिती घेतली असता समाधानकारक उत्तर मिळत नाही वडूज डेपो विचारणा केली असता तहसील कडून गावाची माहिती मिळत नसल्याने हा विषय लांबणीवर पडला आहे. असे सांगण्यात आले या बाबत परिवहनमंत्री रावतें साहेब यांच्याकडे या विभागाची तक्रार करणार आहे मंत्री महोदयांनी आदेश देऊन सुद्धा सातारा परिवहन विभाग झोपला आहे होता का? आदेश देऊन एक महिना झाला तरी गांभीर्य का नाही? आता अंत पाहू नका दोन दिवसात मोफत पास द्या अन्यथा शिवसेने स्टाईल आंदोलनाला सामोरे जा असा इशारा प्रताप जाधव यांनी दिला.