लोकांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली नाही तर नगरपंचायतीला टाळे ठोकणार -: विक्रमबाबा पाटणकर

पाटण :- पाटण शहरातील लौकडाऊन शिथिलता कमी केल्यामुळे पाटण शहरावर अवलंबून असणाऱ्या ग्रामीण भागातील नागरिकांची बाजारासाठी गर्दी होताना दिसत आहे. या उन्हाळ्याच्या तडाख्यात दहा ते पंधरा कि.मी. पायी चालत आलेल्या लोकांना कोरोना संक्रमणाच्या भीतीमुळे शहरात पिण्याचे पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. कोणी पाणी मागितल्यास माणुसकीच्या भावनेतून त्यांना प्यायला पाणी देखील देत नाहीत. अशा परस्थितीत पाटण नगरपंचायतीने पाटण शहरात येणाऱ्या गोर – गरीब लोकांसाठी ठिक – ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. अशी मागणी सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर यांनी केली आहे. नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली गेली नाहीतर पाटण नगरपंचायतीला टाळे ठोकणार असे पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेले दिड महिने सगळीकडे लौकडाऊन संचारबंदी करण्यात आली असताना अनेक ठिकाणी शिथिलता आणून नागरी जिवण पूर्वपदावर आणन्याचा शासनाचा प्रयत्न सुरु झाला आहे. शासनाच्या या निर्णयानुसार पाटण शहरातील लौकडाऊन शिथीलता कमी करण्यात आली आहे. शहराच्या आसपास असणाऱ्या भागातील अनेक लोक हे आर्थिक व्यवहार तसेच किराणा माल, भाजीपाला आणि अत्यावश्यक सेवेत असणारे औषधे, शेतीची बी बियाणे, खते औषध घेण्यासाठी पाटणला येत असतात. परंतु यावेळी कोरोना संक्रमण परिस्थिती ऊदभवली असल्याने व पाटण मध्ये ग्रामीण भागातून येणारे लोक हे जवळपास १०-१५ की. मी परिसरातून पायी चालत येतात या परिस्थितीत या लोकांना पाटण शहरांतील नागरिक, दुकानदार देखील कोरोना संक्रमणाच्या भिती मुळे पाणी देण्यास टाळाटाळ करत आहेत. पायपीट करून ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांमध्ये ज्येष्ठ, वयोवृद्ध, महिला असतात. सध्या ऊन्हाचा पारा जास्त असल्याने तसेच हे नागरिक चालत व ओझे घेऊन असल्याने एखाद्या व्यक्तीला तहान लागली तर पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे या लोकांना शहरातील मुख्य बाजार पेठ, नवीन स्टॅन्ड एरिया, भाजीपाला मार्केट अथवा जुने स्टँड एरिया जिथे लोकांचा वावर जास्त आहे अशा ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात यावी.

 – कोरोना विषाणू हा उष्ण वातावरणात ठिकाऊ धरत नाही. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्वच्छता राखण्या बरोबर शक्य असेल तेवढे गरम पदार्थ खाण्यास अथवा पिण्यास शासनाकडून सांगितले जात आहे. असे असेल तर थंड पेय वगळून चहा विकणारे हौटेल, चहा टपरी सुरक्षेतेचे नियम पाळून चालू करण्यास काही हरकत नाही. असे विक्रमबाबा पाटणकर यांनी सांगितले.