शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसानभरपाई जमा करा अन्यथा आत्मदहन करणार ; विक्रमबाबा पाटणकर यांचा सज्जड इशारा.

पाटण :- गेल्या वर्षी जुलै ते नोव्हेंबर दरम्यान पाटण तालुक्यात शेतकऱ्यांचे, व्यापाऱ्यांचे व नागरी वस्त्यांचे पावसाने व पावसाच्या पाण्याने व कोयना धरण व्यवस्थापनाच्या गलथान व नियोजन शून्य नियोजनामुळे धरणातुन सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे जवळपास तीसहजार शेतकरी, व्यापारी व नागरी वस्त्यांचे प्रचंड  नुकसान झालेले आहे. अद्याप साडेतीन तीन हजार नुकसानग्रस्त हे नुकसानभरपाई पासून वंचित आहेत. कोरोनाच्या प्रार्श्वभुमिवर कोरोनाच्या रोगाशी लढा देणाऱ्या शासकीय योध्दांना सहकार्याच्या भूमिकेतून आम्ही गप्प होतो परंतु आता गेल्यावर्षी चा वाया गेलेला खरीप हंगाम कोरोना व लौकडाऊन मुळे उद्याचा खरीप हंगामाला शेतकऱ्यांनी कसे सामोरे जायचे असा गंभीर प्रश्न पडला आहे. या सर्व बाबींचा विचार करून  तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानभरपाई ची रक्कम जमा करणेबाबतचे आदेश त्वरित द्यावे अन्यथा आम्हाला कोरोनाच्या प्राश्वभूमिवर शासनाला मदत करण्या बाबतचा विचार सोडवा लागून आत्मदहना सारखे उग्र स्वरूपाचे आंदोलन करावे लागेल. असा सज्जड इशारा सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर यांनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण तातपुरते स्थगित करताना शासनाला दिला.

लोकशाही मधे सर्वांना समान न्याय हक्क व अधिकार असताना आजपर्यंत तहसीलदार कार्यालयामध्ये प्रलंबित असणारे पंचनामे दहा महिन्यापासून धुळ खात पडले आहेत. सद्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आसताना शासनाने या परस्थितीत शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यास दुर्लक्ष केले आहे. मागील नुकसानभरपाई देण्यास शासनाला वेळोवेळी मागणी करुन देखील अद्याप शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यास टाळाटाळ केल्याने शासनाच्या विरोधात लाक्षणिक उपोषणास बसावे लागले.

कोरोनाच्या प्रार्श्वभुमिवर सोशल डिस्टिंगशनचे पुर्णपणे पालन करुन उपोषणास बसले आसताना ते पुढे म्हणाले कोरोनाच्या रोगाशी लढा देणाऱ्या शासकीय योध्दांना सहकार्याच्या भूमिकेतून पहात आसताना आम्ही गप्प होतो परंतु आता गेल्यावर्षी चा वाया गेलेला खरीप हंगाम कोरोना व लौकडाऊन मुळे व उद्याचा खरीप हंगामाला आम्ही कसे सामोरे जायच असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. गतवर्षी २०१९ जुलै ते नोव्हेंबर दरम्यान पाटण तालुक्यात अतिवृष्टी पावसाने व कोयना धरण व्यवस्थापनाच्या गलथान व नियोजन शुन्य कारभाराने धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याने शेतकऱ्यांचे, व्यापाऱ्यांचे, नागरी वस्त्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांच्या वाहून गेलेल्या इलेकट्रीक पंप मुजलेल्या विहिरी, नदीकाठचे प्रवाहमुळे वाहून गेलेल्या जमीनी तसेच खरीप हंगामातील पिके यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई काही अल्पशा शेतकऱ्यांना मिळाली. मात्र अद्याप पाटण तालुक्यातील साडेतीन हजार शेतकरी या मदतीपासून वंचित राहिलेले असून त्यांना कोणतेही कसलीही मदत मिळालेली नाही.

शासनाच्या या भेदभाव व दुजाभाव करण्याचा उध्देश व हेतू काय ? लोकशाही मधे सर्वांना समान न्याय हक्क व अधिकार असताना आजपर्यंत तहसीलदार कार्यालयामध्ये प्रलंबित असणारे साडेतीन हजार शेतकऱ्यांचे पंचनामे दहा महिन्यापासून धुळ खात का पडले आहेत..? याचा शोध लावून प्रलंबित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ची मदत देण्यास शासन जोपर्यंत तयारी दाखवत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवणार आसल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी भाजप ता. अध्यक्ष फत्तेसिंह पाटणकर, शेतकरी संघटनेचे ता. अध्यक्ष प्रशांत पाटील, शेतकरी पंडितराव मोरे, अनिल बोधे, शांताराम जंगम, बापुराव मोरे, दिपक घाडगे, मारुती मोरे, संजय पाटील, आदी शेतकरी उपस्थित होते.