मा. विक्रमसिंह पाटणकर यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त मोफत महाआरोग्य शिबीर -: विलासराव क्षिरसागर

 

पाटण- ( शंकर मोहिते ) – मा. विक्रमसिंह पाटणकर माजी मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या अम्रुत महोत्सव निमित्त पाटण येथे जेष्ट नागरीकांसाठी मोफत महा आरोग्य शिबीर बुधवार दि. २८ नोव्हेंबर रोजी श्रीराम नागरी पतसंस्थेच्या भाऊ मोकाशी हौल येथे आयोजित करण्यात आले आहे. या महा आरोग्य शिबीराचा लाभ पाटण तालुक्यातील जेष्ट नागरीकांनी घ्यावा. असे आहवान श्रीराम पतसंस्थेचे चेरमन विलासराव क्षिरसागर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
या प्रसिध्दी पत्रकात पुढे म्हणले आहे. श्रीराम नागरी सह. पतसंस्था व श्रीराम नागरी सेवा संस्था यांच्या सयुंक्त विदमाने प्रकाश हौस्पिटल ऐंन्ड रिसर्च सेंटर इस्लामपूर यांच्या सहकार्याने माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या अम्रुत महोत्सव वाढदिवसानिमित्त पाटण तालुक्यातील जेष्ट नागरीकांसाठी मोफत महाआरोग्य शिबीर बुधवार दि. २८ नोव्हेंबर रोजी भाऊ मोकाशी हौल पाटण येथे आयोजित केले आहे. या शिबीरात मोफत ई.सी.जी.,ब्लड शुगर, व इतर आरोग्य तपासण्या मोफत केल्या जाणार आहेत. ऐडमिट होणाऱ्या रुग्नांना बिलात शंभर टक्के सवलत देण्यात येणार आहे. महात्मा फुले आरोग्य योजने अतंर्गत मोफत औपरेशन व उपचार घेणाऱ्या जेष्ट नागरीकांनी रेशन कार्ड, आधार कार्ड ओळखपत्र आनने आवश्यक आहे. या महाआरोग्य शिबीराचा लाभ पाटण तालुक्यातील जेष्ट नागरीकांनी घ्यावा असे आहवान या प्रसिध्दी पत्रकाव्दारे करण्यात आले आहे.