श्रीमंत सरदार विक्रमसिंह पाटणकर यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमीत्त महाराष्ट्रातील भव्य राज्यस्तरीय निसर्ग चित्रकला स्पर्धा.

पाटण:- ( शंकर मोहिते ) – पाटण महालाचे सरदार श्रीमंत विक्रमसिंह पाटणकर ( दादा ) यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमीत्त किल्ले सुंदरगड ( घेरादात्तेगड ) संवर्दन समिती पाटण आयोजित रविवार दि. १६ डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील भव्य राज्यस्तरीय निसर्ग चित्रकला स्पर्धा आयोजित केली आहे. या निसर्ग चित्र स्पर्धेत महाराष्ट्रातील नामवंत चित्रकारांची हजेरी लागणार असुन या चित्रकला स्पर्धेचे उद्घघाटन शनिवार दि. १५ रोजी सायंकाळी ६ वा. प्रसिध्द चित्रकार रुपेश परुळेकर यांच्या हस्ते व श्रीमंत सरदार विक्रमसिंह पाटणकर यांच्या प्रत्येक्ष व्यक्तीचित्र प्रात्यशिकांने होणार आहे.

सहभागी स्पर्धकांसाठी रविवार दि. १६ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते दुपारी २ या वेळेत पाटण तालुक्यातील निसर्ग पर्यटन कोयना, घाटमाथा, कोयना नदी काठ, सुंदरगड, के टू पौईंट काठी अवसरी, प्रिर्यदर्शन पर्यटन केंद्र- गुणूगडेवाडी, सडावाघापुर, कळंबे तारळे धरण दर्शन अशा विविध नैसर्गिक ठिकाणी प्रत्येक्ष निसर्ग चित्र साकारण्याचे आहेत. तर याच दिवशी दु. ४ वा. चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर होणार असून विजेत्यांचा बक्षिस समारंभ श्रीमंत सरदार विक्रमसिंह पाटणकर यांच्या हस्ते, चित्रकार रुपेश परुळेकर आदी. चित्रकारांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
या निसर्ग चित्रकला स्पर्धेसाठी प्रथम बक्षिस- ७ हजार ७५ रुपये, दुसरे बक्षिस- ५ हजार ७५ रुपये, तिसरे बक्षिस- ३ हजार ७५ रुपये, चौथे बक्षिस- २ हजार ७५ रुपये, आणि उत्तेजणार्थ सहा बक्षिसे प्रत्येकी १ हजार ७५ रुपये तर सर्व सहभागी चित्रकारांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. या निसर्ग चित्रकला स्पर्धेसाठी सहभागी होण्यासाठी २०० रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात आले आहे. इच्छुक स्पर्धकांनी शनिवार दि. १५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वा. पर्यंत आपली नाव नोंदनी ८६०० ३८६१ ४६,- ८००७ ८०३२ ८७,- ९९८१ ९५७४ ८५,- ८९७५ ७६४२ ४३,- ९८२२ ०३५३ २४ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधुन करावी असे आहवान किल्ले सुंदरगड ( घेरादात्तेगड ) संवर्दन समिती पाटण यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.