निवडणुका आल्या की जातीयवादी पक्षांना राम आणि विठ्ठलाची आठवण येते :- खा. शरदचंद्रजी पवार ; विक्रमसिंह पाटणकर म्हणजेच पाटण तालुक्याचा विकास….

पाटण:- (शंकर मोहिते) जातीयवादी पक्षांनी देशात वेगळ वातावरण केल होत म्हणून त्यांना या देशातील जनतेने संधी दिली. आज यांच्या कारभाराला साडेचार वर्ष झाली. या साडेचार वर्षात खोट बोलून लोंकांची फसवणुकच केली. खोट बोलायच पण रेटून बोलायच ऐवढाच उध्दोग या सरकारने केला आहे. निवडणुका आल्या की त्यांना राम आणि विठ्ठलाची आठवण येते. हा सगळा खोटेपणा या देशातील जनतेने ओळखला आहे. म्हणून येणाऱ्या निवडणुकीत समविचारी पक्षांनी एकत्र यायच ठरवल आहे. असे सुचक वक्तव्य करुन विक्रमसिंह पाटणकर म्हणजेच पाटण तालुक्याचा विकास आहे. पाटण तालुक्याचा खऱ्या अर्थाने नंदनवन करायचे असेल तर येथुन पुढेही विक्रमसिंह पाटणकर यांच्या पाठीशी उभे रहा. असे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, खा. शरद पवार यांनी पाटण येथे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री श्रीमंत सरदार विक्रमसिंह पाटणकर यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवस सोहळ्या निमीत्त आयोजित कार्यक्रमात बोलताना सांगितले.

यावेळी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे,आ. शशिकांत शिंदे, आ. छ. शिवेंद्रराजे भोसले, आ. दिपक चव्हाण, भास्करराव जाधव, प्रभाकर घार्गे, माजी आयुक्त प्रभाकर देशमुख, सारंगबाबा पाटील, सातारा जि.प. अध्यक्ष संजिवराजे नाईक- निंबाळकर, उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, सभापती राजेश पवार, पाटण पं.स. सभापती उज्वला जाधव, उपसभापती राजाभाऊ शेलार, सातारा जि. नियोजन समिती सदस्य रमेश पाटील, बापुराव जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
शरद पवार पुढे म्हणाले देशातील व राज्यातील या सरकारला सर्वच क्षेत्रात अपयश आले आहे. आता त्यांच्यांकडे जणतेसमोर जाण्यासारखे काहिच उरले नाही. म्हणुन या सरकारने आता लोंकाच्यासमोर खोट बोलण्याचा उध्दोग सुरु केला आहे. खोट बोल पण रेटून बोल हा आजंठा जितीयवादी सरकारने सुरु केला आहे. निवडणुका लागल्या की यांना आयोध्येचा राम आठवतो. आता पंढरपूरचा विठ्ठल हि आठवायला लागला आहे. या खोट्या देखाव्याला या देशातील जनता कधी फसणार नाही. आता पर्यंत फसली ऐवढ बास झाल. असा घणाघात भाजप-शिवसेना सरकारवर करुन शरद पवार पुढे म्हणाले आज राज्यातील व देशातील शेतकरी दु:खी झाला आहे. शेतकरी हि लाखाचा पोशिंदा आहे. म्हणुन शेतकऱ्याला सुखी करण्याच काम आपल्याला करायच आहे. शेतकरी सुखी तर संपुर्ण देश सुखी होईल असे त्यांनी यावेळी सांगितले. आसताना ते पुढे म्हणाले आरक्षणाच्या बाबतीत जस धनगर समाजाला फसवल गेल तस मराठा समाजालाही फसवल गेल आहे. मी आरक्षणाच्या विरोधात नाही. पण मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत या मताचा मी आहे. असे सांगुण शरद पवार पुढे म्हणाले.
विक्रमसिंह म्हणजे पाटण तालुक्याचा विकास आहे. अविष्यातील पन्नास वर्ष त्यांनी पाटण तालुक्याच्या विकसासाठीच घालवलित. विक्रमसिंह पाटणकर कधी मंत्री पद मागायला आले नाहीत. पण त्यांचे काम आणि विकासाची धडपड बघुन त्यांना डायरेक्ट कँबिनेट मंत्री केले. महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आसताना राज्यातील अनेक प्रकल्प त्यांनी हाती घेतले. आणि ती पुर्णत्वात आणन्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यावेळी सगळी काम त्यांनी करुण ठेवलीत. म्हणून आज नविण राज्यकर्ते हि कामे आम्ही केलीत म्हणून सांगत फीरत आहेत.
कोयना धरणामुळे पाटण तालुक्याची ओळख महाराष्ट्रातील घराघरात झाली. कोयनेच्या विजेमुळे महाराष्ट्र ल्लख झाला. मात्र १९६७ च्या भुंकपाने पिटण तालुक्याला आंधारात नेल. तालुक्याचे न भरुन येणारे नुकसान झाले. या काळात झालेल नुकसान विक्रमसिंह पाटणकर यांनी आमदार झाल्या-झाल्या भरुन काढले. हे नुकसान भरुन काढताना त्यांनी ऐका वेळी पाटण तालुक्यातील २१० गावांत विजपुरवठा करण्याचा विक्रम केला.
यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले गेले साडेचार वर्ष आपण सर्वजण सत्तेचा परिणाम भोगत आहोत. केवळ लोकांना भुलवण्याचे काम या राज्यकर्त्यांकडून होत आहे. निवडणुका आल्या की कुठ राम मंदिर, कुठ पंढरपुर, कुठ पुतळा अस भावनिक करण्याच काम राज्यात सुरु आहे. आता या भुलथाप्पांना त्यांची जागा दाखविण्याची वेळ आली असुन राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि समविचारी पक्षांनी एकत्र येणे आवश्यक आहे. आसे सांगुन पृथ्वीराज चव्हाण यांनी शरद पवार यांच्या वर स्तुथीसुमने उधळुन देशाचा क्रुर्षि मंत्री आज कोण आहे हे सांगता येत नाही. उत्क्रुष्ठ क्रुर्षि मंत्री म्हणुन शरद पवार यांची देशाला ओळख आहे. तर विक्रमसिंह पाटणकर यांनी पाटण तालुक्याचा विकास करताना आनेक प्रकल्प उभे करुन रोजगार निर्मिती केली. व कुठुंब सुखी केलीत म्हणुनच त्यांच्या या अमृतमहोत्सवी वाढदिवसाला संपुर्ण पाटण तालुका लोटला आहे. असे त्यांनी सांगितले.
यावेळी विक्रमसिंह पाटणकर म्हणाले जे संस्कार माझ्या वाढ-वडीलांनी केले ते संस्कार माझ्यावर आहेत. गेली पन्नास वर्षे तुमचे प्रेम मला मिळाले म्हणुन हे विकास कार्य करत राहिलो. हा विकास करताना दळण-वळण, पाणी योजना, समाज मंदीर, शाळा , प्रकल्प उध्दोग उभे करण्यासाठी पाटण तालुक्यातील जनतेचा मोठा अर्शिवाद मला मिळाला. पाटण तालुक्याचे हे ऋण मी अविष्यभर विसरणार नाही. हे सांगताना विक्रमसिंह पाटणकर यांना गहिवरुण आले.
सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील म्हणाले मंचकावर बसलेलो आम्ही बऱ्याच वर्षापासून शरद पवार साहेबांच्या नेतृत्वा खाली कामकरताना देशाचा व राज्याचे हीत पहात चोफेर विकास केला. या राज्यातील माय-भगिनीनी पाठबळ दीले. ही विकास कामे करताना सत्तरी पुर्ण करीत आहे. आता नव्या उमद्या नेतृत्ववाला वसा आणी वारसा देत आहोत. जनतेने ही त्यांच्या पाठीशी खंबिर पणे उभे राहुन त्यांंचे पाठीशी रहा असे त्यांनी सांगितले.
जयंत पाटील म्हणाले पाटण तालुक्याच्या विविध खोऱ्यात दादांच्या बरोबर गेले २५ ते ३० वर्ष फीरत असताना तालुक्यातील चेहरा मोहरा बदलताना कसे परिश्रम घेतले याचे आम्ही साक्षीदार आहोत. पर्यटन, पवनचक्याचे जाळे, हरित क्रांती हे केलेच पण भुकंप, अतिवृष्टी, प्रकल्प ग्रस्थांसाठी कोट्या वधीचा निधी आनला बाळासाहेब देसाई यांचे नंतर विक्रमसिंह पाटणकर हे तालुक्याला नव्हे तर राज्याला गती देणारा नेता मी महाराष्ट्रात पहील्यांदाच पाहीला आहे. त्यांचेच पध्दतीने सत्यजितसिहं पाटणकांची काम करण्याची पध्दत असुन त्याचे पाठीशी खंबीरपणे उभे रहा असे त्यांनी सांगितले.
पाटण तालुक्याचा १९८३ नंतर खऱ्या अर्थाने विकासाला गती मिळाली ती विक्रमसिहं पाटणकर दादांच्या मुळेच त्यांनी सर्व सामान्य माणुस विकासाचा केद्रं बिंदु माणुन तालुक्याचा कायापालट केला म्हणुनच सर्व सामान्य माणसाचा आशिर्वाद त्याच्यां पाटीशी राहीला. दादांच्या कामाची पोच पावती व त्यांना शुभेच्छा द्यायच्या असतील तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी खबिंरपणे उभे राहुन सत्यजीतसिंह पाटणकर यानां आमदार करा असे अवाहन शशिकांत शिदें यांनी केले माथाडी कामगाराना उभे करण्याचे काम शरद पवार साहेबांनी केले माथाडी कामगार शरद पवार साहेबांना दैवत मानतो पाटण तालुक्यात ही माथाडी कामगार मोठ्या प्रमाणात आहेत त्यांचे प्रश्न दादांनी शरद पवारसाहेबांच्या कडुन सोडवले आहेत. त्यामुळे पाटण तालुक्यातील माथाडी कामगार हे राष्ट्रवादी पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील व भाजपाची सत्ता उलथुन टाकतील असा ठाम विश्वास त्यानी व्यक्त केला.


या वेळी सत्यजितसिहं पाटणकर म्हणाले कि १९८३ पुर्वी या तालुक्याची काय अवस्था होती हे जुनी जानती मडंळी सागंत आहे. या गावावरुन दुसऱ्या
गावाला जायचे तर दोन दोन दीवस चालत पाटणला यावे लागत होते. डोगंर माथ्यावरील गावांसाठी रस्याचे जाळे विनुन गावे जोडली गेली. नेरळे व सागंवड पुल सोडले तर कोयना नदी काठी असनाऱ्या जनतेला नावे शिवाय पर्याय नव्हता मेढेंघर पासुन ते तांबव्या पर्यंत कोयना नदीवर सात पुल झाले ते विक्रमसिहं पाटणकर व पृथ्वीराज बाबाच्या मुळे पण विरोधकांचा एकच टेका की दादानी काय केले. तुम्ही कोनता घाट फोडला कोणता नविन पुल बांधला कोणता नविन रस्ता केला ते सांगा. पहिल्या पिढीने क्रांती केली दुसरी पिढी राबली आणि आणि तिसऱ्या पिढीने घडी बसवली आज दादांच्या बरोबर असणारी पहीली पिढी आहे. दुसरी पिढी आहे. आणि तरुणाईची तिसरी पिढी पण आहे. असे त्यांनी सांगितले.
दरम्यान खा. शरद पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, रामराजे नाईक- निबांळकर, श्रीनिवास पाटीर, जयंत पाटील यांच्या हस्ते व आदी मान्यवरांच्या उपस्थितीत श्रीमंत सरदार विक्रमसिंह पाटणकर यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस सोहळ्यानिमीत्त पाटण तालुक्याच्या वतिने नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी पाटण तालुक्यातील नागरीक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.