वाट पहाणारे दादा……

( शंकर मोहिते ):-
*भैरवगडाची माहिती आणि फोटो आणन्यास पाठवलेली पोर रात्री उशीरा पर्यंत परत का आले नाहीत. म्हणून काळजीत आणि चिंतेत पडलेले दादा.. स्वत:ची बंदुक आणि दोन साथीदारांना बरोबर घेऊन त्या रात्री १.३० वा. भैरवगडाकडे आले. नाव या गावी आल्यानंतर त्यातल्या निकटच्यां कार्यकर्त्यांना रात्री उठवून आमच्या बध्दल चौकशी केली. या कार्यकर्त्यांनी दादानां सांगितल.. दादा तुम्ही काहीभी काळजी करु नका. ती पोर मुक्कामी गडावर गेलेत त्यांच्याबरोबर आमच्या गावाततील दोन पोर आहेत. अस दादांनी ऐकल्यावर काळजीचा सुटकारा त्यांनी सोडला आणि पुन्हा ते पाटणला आले..*

तस पत्रकार म्हणून दादांच्या सहवासात होतोच. हा सहवास बातमी पुर्ता मर्यादित होता. मात्र बातमीतल्या सहवासा पलिकडे जाऊन दादांनी माझ्यावर एक जबाबदारी दिली. पाटण तालुक्याचे चित्ररुप दर्शन पुस्तकाच्या माध्यमातुन मांडण्याचे. यातुनच “कोयना पर्यटन” या पुस्तकाची निर्मीती झाली…


पाटण तालुक्यातील निसर्गाच्या सानिध्यात असलेली सर्व नैसर्गिक प्रेक्षणिय स्थळे, धार्मिक स्थळे, इतिहासिक गड किल्ले आदी प्रकल्प याचे चित्ररुप पुस्तक साकारण्याची जबाबदारी दादांनी माझ्यावर टाकली. महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री असताना त्यांनी पाटण तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी नवीन धोरणे अकुन नैसर्गिक सौंदर्य आसलेल्या पाटण तालुक्यात राज्य शासनाकडून ७५० कोटी खर्चाचा नवीन महाबळेश्वर प्रकल्प निर्माण करण्याचा निर्णय घेतला होता. या प्रकल्पात पाटण तालुक्याचे खरे नंदनवण होणार होते. मात्र तालुक्यातील विरोधकांनी या प्रकल्पाचा कमी अभ्यास करुन व विरोधाला विरोध म्हणुध प्रकल्पाला विरोध केला. या विरोधामुळे खऱ्या अर्थाने सर्व बाजुंनी तालुक्याचा होणारा विकास रोखला. तद्नंतर झालेल्या २००४ च्या विधानसभा निवडणुकीत दादांचा पराभव झाला. आणि नवीन महाबळेश्वरचे पाहिलेले स्वप्न अधुरेच राहिले.
या पराभवात खचुन न जाता दादांनी पाटण तालुक्यात पर्यटन वाढीसाठी अखंडीत प्रयत्न सुरु ठेवले. या काळात दादांनी मला वाड्यावर बोलवून सांगितले.. मोहिते पाटण तालुक्याचे पर्यटन पुस्तकाच्या माध्यमातून पर्यटकांपर्यंत पोहचवायचे काम आपणाला करायचे आहे. यासाठी आपणाला पुस्तक निर्मिती करावी लागेल. आणि हे काम मी तुमच्यावर देत आहे. मी पटकण हो म्हणत पुस्तक निर्मीतीची जबाबदारी घेतली. आणि कामाला लागलो. हे काम करत असताना प्रत्यक्ष नवनवीन नैसर्गिक प्रेक्षणिय स्थळे, धार्मिक स्थळे, इतिहासिक किल्ले आदी ठिकाणी जाण्याचा योग आला. या ठिकाणचा अभ्यास करता आला आणि माहिती घेण्यात आली.
पाटण तालुक्यातील कोयनेच्या घाट माथ्यावर चांदोली-कोयना अभयारण्याच्या दाट जंगलात असणाऱ्या भैरवगडावर जाण्यास दादांनी मला सांगितले सकाळी लवकर जाऊन संध्याकाळी परत या यासाठी गाडीची वेवस्था त्यांनी करुन दिली. त्यावेळी भैरवगडावर जायच म्हणजे थोडस जीकरीचच काम. दाट जंगल, कच्चा रस्ता, भैरवगडावर सकाळी जाऊन संध्याकाळी परत येण शक्य नव्हते तरीही त्यांना हो म्हणल. त्या दिवशी पाटण अर्बन बँकेची महिंद्रा गाडी मिळायलाच आकरा वाजले. सारथी दिपकराज निकम, फोटोग्राफर अविनाश कुंभार, के.डी. चव्हाण, पत्रकार मंगेश पवार आणि मी (शंकर मोहिते) भैरवगडाकडे जाण्यास निघालो.
हेळवाक पासून पुढे कच्चा रस्ता, नाव-पाथरपुंज वरुन अगदीच खाच-खळग्याचा कच्चा रस्ता दाट जंगल कुठ-कुठ गाडी जाईल असे खाच-खळगे भरुन पुढे प्रवास करवा लागणार अस कोयनेतच पाथरपुंज-नाव वरुन बाजारासाठी आलेल्या एक-दोन नागरीकांनी अम्हाला सांगीतल. हे सगळ ऐकल्यावर गडावर मुक्काम होणार हे नक्कीच झाल. मग कोयनेत मुक्कामाचे साहित्य, जेवणाचे साहित्य खरेदी करुन बाजारासाठी आलेल्या नाव-पाथरपुंजच्या नागरीकांना घेऊन आम्ही भैरवगडाकडे निघालो. ऐवढ्या बिकट आणि कच्च्या रस्त्यातुन जाताना पाथरपुंज च्या पुढे भल्लमोठ फणसाच झाड रस्त्यावर आडव झाल होत. हे पाथरपुंजच्या नागरीकांना माहिती होत. त्यांनी आमच्याबरोबर येताना घरातुन दोन कु-हाड, कोयते बरोबर घेतल होत. रस्त्यावर आडवे पडलेल्या झाडाजवळ आलो आणि सर्वांनी थोडे-थोडे कु-हाडीचे घाव घालून ते झाड रस्त्या बाजुला केल. आणि भैरवगडाकडे जाणारा रस्ता मोकळा केला. अशा बिकट परस्थितीत सांयकाळी ५.३० वा. भैरवन्नाथाच्या मंदिरा जवळ पोहचलो. या मंदिरा पासुन समोरच्या डोंगरावर किल्ला होता. ऐवढ्या उशीरा तिथ जाण धोक्याचेच म्हणुन भैरवन्नाथाच्या मंदिरात मुक्काम ठोकला.
..भैरवगडाची मिहिती आणि फोटो आणन्यास पाठवलेली पोर रात्री उशीरा पर्यंत परत का आले नाहीत. म्हणून काळजीत आणि चिंतेत पडलेले दादा.. स्वत:ची बंदुक आणि दोन साथीदारांना बरोबर घेऊन त्या रात्री १.३० वा. भैरवगडाकडे आले. नाव या गावी आल्यानंतर त्यातल्या निकटच्यां कार्यकर्त्यांना रात्री उठवून आमच्या बध्दल चौकशी केली. या कार्यकर्त्यांनी दादानां सांगितल.. दादा तुम्ही काहीभी काळजी करु नका. ती पोर मुक्कामी गडावर गेलेत त्यांच्याबरोबर आमच्या गावाततील एकजण आणि नाव येथील दोघेजण पोर आहेत. अस दादांनी ऐकल्यावर काळजीचा सुटकारा त्यांनी सोडला आणि पुन्हा ते पाटणला आले..


सकाळच्या कवळ्या उन्हात आम्ही भैरवगडावर गेलो माहिती गोळा केली. फोटो काढले आणि पुन्हा पाटणला येण्यास निघालो. दुपारी नाव येथे आल्यानंतर तुमच्या शोधासाठी रात्री स्वत: दादा.. येथे आले होते. आले होते. अस नागरीकांनी सांगितल्यावर आम्ही सर्वजण चक्कीत झालोच आणि थोडी भितीही वाटली. पाटणला गेल्यावर आपल काही खैर नाही.. पण आमच्या आधीच दादांना सर्व हकीकत समजली होती. त्यामुळे त्यांचा राग शांत होता.
“कोयना पर्यटन” पुस्तकाची दुसरी आव्रुती बाजारात असुन आता www.koynatourisum.com हि वेबसाईट ही आहे. या वेबसाईटवर “कोयना पर्यटन” पुस्तिका पाहायला मिळते.

शंकर मोहीते.
पत्रकार पाटण.