विशाल मेगा मार्ट इमारतीला शॉर्ट सर्किटने आग; मोठे नुकसान

सातारा : सातारा शहरातील सदरबझार येथे अजिंक्य प्रेस जवळ असणार्‍या विशाल मेगा मार्टला मंगळवारी रात्री 9.30 वाजता अचानक शॉर्ट सर्कीटने आज लागून मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान, घटनास्थळावर आग विझविण्यासाठी सातारा नगरपालिकेचे अग्निशामक दलाचे बंब पाचारण करण्यात आले आहेत. घटनास्थळावर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. घटनास्थळाला रात्री खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी भेट देवून पहाणी केली. या आगीत नेमकी किती नुकसान झाले याची माहिती मिळू शकली नाही.