प्लॅस्टीक निर्मूलनासाठी वडूज नगरपंचायतीची जनजागृती फेरी

वडूज : वडूज शहर परिसरातून प्लॅस्टीक पिशव्यांचे संपूर्ण निर्मूलन करावे यासाठी वडूज नगरपंचायतीचे पदाधिकारी व प्रयास सामाजिक संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी शहरातून जनजागृती फेरी काढली.
यावेळी नगराध्यक्षा शोभा माळी, मुख्याधिकारी माधव खांडेकर, नगरसेवक डॉ. महेश गुरव, सुनिल गोडसे, विपूल गोडसे, शहाजी गोडसे, वचन शहा, सौ. किशोरी पाटील, सुनिता कुंभार, सुवर्णा चव्हाण, अभय देशमुख, काका बनसोडे, डॉ. प्रशांत गोडसे, राजेंद्र चव्हाण, राजेंद्र कुंभार, अनिल माळी, सचिन माळी, जयवंत पाटील, प्रयासचे डॉ. कुंडलीक मांडवे, डॉ. प्रविण चव्हाण, इश्‍वर जाधव,मुन्ना मुल्ला आदी सहभागी झाले होते. वरील पदाधिकार्‍यांनी शहरातील दुकानांत व्यवसायिकांना प्लॅस्टीक वापरामुळे पर्यावरणाचा होणारा र्‍हासाचे महत्व पटवून दिले. तसेच शहरातील लहान मोठ्या व्यवसायिकांनी प्लॅस्टीकचा वापर न करता कापडी, कागदी पिशव्या वापरण्याचे आवाहन केले. आगामी काळात प्लॅस्टीक पिशव्यांचा वापर करणार्‍यांच्या विरोधात शहरात कडक कारवाईचे धोरण अवलंबण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.