महाबळेश्वर मध्ये पशु-पक्षांसाठी पाणी व निवासाची सोय करून देण्याचा उपक्रम 

????????????????????????????????????

(छाया : संजय दस्तुरे)

महाबळेश्वर ः  सध्या सर्वत्र उन्हाळी हंगाम सुरु असून वाढत चाललेले उन्हाचे चटके ,निष्पर्ण होत असलेली झाडे -झुडपे ,तसेच दुर्मिळ होत चाललेले पाण्याचे साठे या मुळे मुक्या पशु -पक्षी यांना आपला जीव वाचविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.
सतत वाढत चाललेल्या उन्हाच्या चटक्यामुळे वन्यजीव ,पशु पक्षी यांची राहण्यासाठी व पाण्यासाठी भटकंती सुरु आहे. कोणी पाणी देता का पाणी ?अशी हाक मारणार्‍या मुक्या जीवांना आता पाणवठे ,थोडे धान्य देण्याची गरज आहे.आणि याच उदात्त हेतूने द कांझार्वेशन  फौडेशन ऑफ इंडिया या सेवा भावी संस्थेने राज्यात सर्वत्र पक्षी वाचवा या अभियाना अंतर्गत राज्यभर पशु पक्षांसाठी पाणी व निवासाची सोय करून देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे .पक्षांसाठी बांबूपासून बनविलेली घरटी व पाणी पात्र झाडांवरती ठेवून त्याची राहण्यासाठीची व पाण्यापासुनची होणारी गैरसोय दूर करण्याच प्रयत्न केला जात आहे . द कांझार्वेशन  फौडेशन ऑफ इंडियाच्या वतीने तयार केलेली बांबूची घरटी व पिण्यासाठी पाणी पात्र महाबळेश्वर भागात मोफत देण्याचा  शुभारंभ येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या आवरापासून न्यायमूर्ती पी.ए.कुंभोजकर यांच्या हस्ते व महाबळेश्वरचे तहसीलदार रमेश शेंडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला .यावेळी द कांझार्वेशन  फौडेशन ऑफ इंडिया चे अध्यक्ष आशिष घेवडे ,महाबळेश्वर तालुका वकील संघाचे अध्यक्ष विजयकुमार दस्तूरे ,उपाध्यक्ष  जयेंद्र बोधे वकील ,संजय जंगम वकील , रेणुका ओंबळे वकील,एन.आर .शेख वकील ,जी. बी. धोत्रे ,कोन्स्तेबल गायकवाड   तसेच द कांझार्वेशन  फौडेशन चे पदाधिकारी धैर्यशील पवार वकील ,सतीश भोजे व नितेश घेवडे आदी मान्यवर उपस्थित होते .यावेळी न्यायालयाच्या आवारात ,तहसील कार्यालयाच्या आवारात तसेच नगरपालिकेच्या आवारात झाडांवर बांबूची घरटी व पाणी पात्रे ठेवण्यात आली .
आज पर्यंत राज्यभर या संस्थेच्या वतीने वृक्षारोपण -वृक्ष संवर्धन तसेच पशु पक्षांसाठी घरटी ,पाणी पात्रे ,खाण्यासाठी दाणे मोफत देण्याचे अनेक विविध उपक्रम राबविले गेल्याची माहिती द कांझार्वेशन  फौडेशन ऑफ इंडिया चे अध्यक्ष आशिष घेवडे(कोल्हापूर ) यांनी दिली .