वेस्ट झोन नॅशनल स्पर्धेत रिषीका होले, आयुष मोकाशी यांचे यश

साताराः गोवा येथे नुकत्याच झालेल वेस्ट झोन नॅशनल बॉक्सिंग अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत सातारा बॉक्सिंग अकॅडमीच्या रिषिका रविंद्र होले हिने मुलींमध्ये सुवर्णपदक तर मुलांमध्ये आयुष अमर मोकाशी याने रौप्य पदकाची कमाई केली.
रिषिका आणि आयुष दोघेही राष्ट्रीय खेळाडू असून गोवा येथे झालेल्या मुलींच्या स्पर्धेत 46 ते 48 किलो वजन गटात सुवर्णपदक तर आयुष अमर मोकाशी याने 54 ते 57 किलो वजनगटात रौप्य पदक पटकावले. दोघांनाही महाराष्ट्र संघाचे मुख्य प्रशिक्षक सागर जगताप, सहप्रशिक्षक मयुर बोरसे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल रिषिका होले आणि आयुष मोकाशी याचे आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक- निंबाळकर, महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे भरतकुमार व्हावळ, सातारा जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे, सातारा बॉक्सिंग अकॅडमीचे अध्यक्ष हरिष शेट्टी, दौलत भोसले, अमर मोकाशी, रविंद्र होले, संजय पवार, विनोद राठोड, मयुर डिगे, समीर बागल यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि पलकांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.