कोरोना ची लागण साखळी तोडायची असेल तर काय काय करायला लागेल

भाग- २

पाटण:- कोरोना ची लागण साखळी तोडायची असेल तर काय काय करायला लागेल.. खूप काही करायला लागणार आहे. त्या पैकी पाहिले एकमेकांकडून होणारा संसर्ग रोखावा लागेल. ते कसे, त्या साठी काय करावे लागेल. पहिले रुग्णालयातून होणारे संसर्ग संक्रमण कसे कमी करता येईल ते जाणून घेऊ या.
यासाठी रुग्णालयातील प्रचलित पारंपरिक पद्धत आहे त्यात विलक्षण बदल करावा लागेल व हा बदल करणे काळाची गरज होऊन बसले आहे. हा बदल करणे अपरिहार्य असून थोडा अपचनिय पण आहे परंतु खूपच गरजेचा आहे. सध्या सरकारी सुचणे नुसार रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभागा मध्ये दोन प्रकार चालू केले आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत.

१. ताप रुग्ण विभाग
२. सर्व सामान्य रुग्ण विभाग

असे का तर कोरोना रुग्णामध्ये मुख्यत्वे सुरवातीस लक्षण म्हणजे ताप आहे. याचा अर्थ असा नाही की, सर्व ताप रुग्ण कोरोना ग्रस्त असतीलच.. यात गफलत नको. त्या साठी फोटो ओ. पी. डी म्हणजे सूर्य प्रकाशातील बाह्य रुग्ण विभाग.. हे कसे करायचे या साठी महत्वाचे रुग्णालय जमिनी समांतर असेल तर सोपे होईल. रुग्णालयाच्या गेट वर रुग्णांनी तोंडाला मास्क लावला आहे ते शिपाई कर्मचारी बघेल व तापाचे रुग्ण कोण आहेत त्यांना ताप रुग्ण विभागाकडे पाठवेल. व इतर रुग्ण सर्व सामान्य विभागाकडे पाठवले जातील यामुळे रुग्णांचे विलगीकरन होईल.

या नंतर पुढच्या क्रमात खूप बदल आहेत जे अपरिहार्य आहेत.. ज्या योगे रुग्णालयाचा आतील भाग कोरोना ने संक्रमित होणार नाही. व इतर रुग्णांना ही कोरोना लागण होणार नाही. या पद्धतीत रुग्णालयाच्या खिडक्या व बाहेरील बाजू चे दरवाजे वापरावे लागतील. ते कसे ते समजून घेऊ या.
पहिल्या खिडकीत कमीकमी एक मीटरचे सुरक्षित अंतर ठेऊन केस पेपर वरील माहिती रुग्ण देतील व आतल्या बाजूनेही सुरक्षित अंतर ठेऊन केस पेपर लिहिला जाईल. तो केस पेपर तसाच आतल्या बाजूने डॉक्टरांच्या तपासणी विभागात दिला जाईल व त्या विभागातील खिडकीच्या बाहेरच्या बाजूने रुग्ण येऊन डॉक्टरांना स्वतः च्या आजाराची माहिती देतील. त्यावेळी डॉक्टर केस पेपर वर औषधे लिहून देतील. त्यानंतर तसाच तो रुग्ण बाहेरील पुढच्या खिडकी कडे म्हणजे औषध विभागाकडे जाईल व आतल्या बाजूने तो केस पेपर औषध विभागात जाईल व त्या रुग्णांस औषध दिले जाईल. यामुळे केस पेपर ही कोरोना संक्रमित होणार नाही.

या दरम्यान डॉक्टरांना अत्यंत गरज भासलीच व रुग्ण अस्वथ वाटला तरच त्याचा रक्त दाब तपासणे, इंजेक्शन देणे, प्रयोगशाळा तपासणी इत्यादी साठी आत पाठवतील. अत्यस्थ रुग्ण कोणते उदा. अपघाती रुग्ण, विष प्राशन केलेला रुग्ण, सर्पदंश, हृदय विकार, उच्च रक्त दाब, गर्भवती महिला इत्यादी. रुग्णाला आत घेताना त्याचे हात निर्जंतुक करून आत घ्यावे. अशा प्रत्येक प्रकारच्या रुग्णाची बैठक व्यवस्था वेगवेगळी व दोघांमधील अंतर एक मीटर असावे. त्या प्रमाणे रुग्णांना सूचना कराव्यात. कोणत्याही प्रकारे रुग्णाला कोरोना ची लागण होणार नाही याची काळजी रुग्णालयात घेण्यात यावी. त्यासाठी दर दोन ते चार तासांनी दवाखान्यातील सर्वांच्या बसण्याच्या जागा, खुडच्या,टेबल,तपासणी टेबल, बेड व बेडसेट हे सर्व सहंत हाइपो क्लोराईड द्रावणाने निर्जंतुक करून घ्यावे. त्याच बरोबर बाहेरचा भाग की ज्या मार्गे रुग्ण येत आहेत तो रस्ता, जागा हायपो क्लोराईड ने दर दोन ते चार तासांनी निर्जंतुक करावे. त्याच बरोबर कोरोना विषाणू मलमुत्रतून ही पुढे जात आहे त्यामुळे रुग्णालयातील टॉयलेट बाथरूम ही वरील द्रवणाने निर्जंतुक करावे.

*टीप* -> रुग्णांनी घरामध्ये जण्या अगोदर घरा बाहेरच साबण लावून चप्पल सह हातपाय स्वच्छ धुवून घेणे व जर शक्य असेल तर गरम पाण्याने अंघोळ करावी. त्याच बरोबर अंगावरील जे कपडे होते ते सर्व डिटर्जंट मध्ये भिजवावे व अर्ध्या तासाने कपडे धुतले तरी चालतील.
सदरील टीप औषध विभागाच्या बाहेर लावावी जेणे करून रुग्णांना जाताना ध्यानात राहील, की घरात जान्या अगोदर काय करावे लागेल..
रुग्णालयात रुग्णांनी गर्दी होऊ नये, यासाठी काही बदल रुग्णालयात ठीक ठिकाणी केले आहेत. किरकोळ औषधे आशा ताईं च्याकडे असावीत व हे त्या गावातील, भागातील लोकांना त्याची माहिती द्यावी. यामुळे साध्या साध्या आजाराचे रुग्ण रुग्णालयात येणार नाहीत. औषधे देऊन एक दोन दिवसात फरक नसेल तर त्या रुग्णाला रुग्णालयात पाठवावे. या बरोबर जे भागातील नोंदीत उच्च रक्त दाबाच्या, डायबेटिस च्या रुग्णांचीही महिन्याची औषधे त्यांच्या भागात उपकेंद्रात व आशा ताईं च्या कडे सपूर्त करावीत. मोठ्या रुग्णालयात गेट वर मिकिंग द्वारे जाहीर निवेदन व सूचना करण्यात याव्यात ज्यायोगे तेथील नियोजन व्यवस्थित होईल.
पुढच्या लेखात बघू कारोनाची साखळी तोडण्यासाठी अजून काय उपाययोजना कराव्या लागतील.

वरील लेखकाचे मत वैयक्तिक असून जर उपयुक्त वाटले तर जरूर वापरावे.
शासनाला सहकार्य करा घराबाहेर निघू नका फक्त कोरोनाला हरवायचे आहे.

आपला मित्र,
श्री संपा.
मायक्रो बायोलॉजिस्ट
शासकीय रुग्णालय महाराष्ट्र.