अपेक्षापूर्तीसाठी परिश्रम करा,मदतीसाठी मी सदैव तयार : प्रभाकर देशमुख

म्हसवड ः माणदेश तुमच्याकडे खूप अपेक्षेने पहात आहे,त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी योग्य दिशा निश्चित करून परिश्रम करा व यासाठी लागेल ती मदत करण्यासाठी सदैव तयार असेल असे मत कोकण विभागाचे माजी महसूल आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी केले.
म्हसवड येथील फलटण एज्युकेशन सोसायटीच्या सिद्धनाथ हायस्कुल येथे स्पर्धा परीक्षा अभ्यासवर्ग व मार्गदर्शन केंद्राच्या उदघाटन प्रसंगी प्रभाकर देशमुख बोलत होते.यावेळी म्हसवडचे नगराध्यक्ष तुषार वीरकर,माजी नगराध्यक्ष श्रीमंत अजितराव राजेमाने,विलासराव माने,माणदेश फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक माने,माजी नगरसेवक युवराज सूर्यवंशी,प्रा.कविता म्हेत्रे,बाळासाहेब राजेमाने,युवराज बनगर, चिन्मय अकॅडमी पुणे चे संतोष वटम्मवार,यूपीएससी सेल यशदा पुणे चे माजी संचालक सतीश पाटील,प्रवीण इंगळे,सुप्रिया भोसले,अभय जगताप, फ.ए. सो.ग. कौ.सदस्य व शाळा समितीचे व्हा.चेअरमन श्रीमंत पृथ्वीराज राजेमाने,प्राचार्य डॉ.सर्जेराव घोलप,प्राचार्य अरुण काकडे आदी मान्यवर उपस्थित होते.दुष्काळी माण तालुक्यातील युवक दुष्काळी परिस्थिवर मात करण्यासाठी स्पर्धा परीक्षेचा मार्ग अवलंबत आहेत.त्यामूळे माणदेशातील जनता या युवकांकडे मोठ्या अपेक्षेने पहात आहे.या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी युवकांना कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही.कठोर परिश्रमा बरोबर दिशा निश्चित करू  मार्गदर्शन घेणे अवश्यक आहे.यासाठी लागणारी मदत देण्यासाठी मी सदैव तयार असल्याचे प्रभाकर देशमुख यांनी सांगितले.व ते पुढे म्हणाले मोठे होण्यासाठी घरातील पाश सोडणे आवश्यक आहे.स्पर्धा परीक्षेमध्ये एखाद्या परिस्थितीस कश्याप्रकारे सामोरे जात हे प्राधान्याने पाहिले जाते,शिवाय प्रसकीय सेवेत संवेदना घेऊन काम करावे लागते याची सतत जाणीव ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले व माणमधील मधील स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्‍या युवकांनी एवढी प्रगती काराविकि त्यांना टेबलाच्या एका बाजूस बसल्याचे मला पाहिला आवडेल व ती क्षमता येथिल युवकांच्यात असल्याचा विश्वास व्यक्त करून माणच्या मातीने वाईट परिस्थितीवर मात करण्याचे शिकवले असून पुन्हा याच मातीत जन्म घ्यायला आवडेल असेही देशमुख यावेळी म्हणाले.
आपल्या प्रास्ताविकात श्रीमंत पृथ्वीराज राजेमाने म्हणाले माणामधील युवक करीत असलेल्या स्पर्धा परीक्षेची तयारी पाहून त्यांना असणार्‍या मार्गदर्शनाची व अभ्यासकेंद्राची गरज ओळखून प्रभाकर देशमुख यांनी विद्यालयाच्या ग्रंथलयास स्पर्धा परीक्षेसाठी लागणारी पुस्तके,संगणक संच तसेच अभ्यासकेंद्राची व्यवस्था केली असून त्यांचे मार्गदर्शन येथील युवकांना सतत मिळत राहणार असून विध्यार्थ्यानी या संधीचा फायदा करून घ्यावा व देशमुख यांनी म्हसवडकडे अधिक लक्ष द्यावे ही अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी सतीश पाटील,संतोष वटंवार,प्रा.कविता म्हेत्रे,सुप्रिया भोसले,प्रवीण इंगळे यांनी आपले विचार व्यक्त केले.  यावेळी प्रभाकर देशमुख यांनी ग्रंथतुला करून ते ग्रंथ येथील अभ्यासकेंद्रास देण्यात आले.      सूत्रसंचालन सुशांत तवटे यांनी तर उपस्थितांचे आभार प्राचार्य काकडे यांनी मानले.