प्रयत्नात सातत्य ठेवा निश्‍चीत यश मिळेल ः डॉ. राजेंद्र सरकाळे

शिवनगरः आपले उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून मेहनत, कष्ट व प्रयत्न केल्यास कोणतीही गोष्ट अशक्य नाही. यामध्ये अपयश जरी आले, तर डगमगून जावू नका. कारण प्रयत्नात सातत्य ठेवल्यास निश्‍चीतपणे यश मिळत असते. असे प्रतिपादन सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी केले.
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना संचलित जयवंतराव भोसले कृष्णा कृषि महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले होते. व्हा.चेअरमन जगदिश जगताप, संचालक दयानंद पाटील, गुणवंतराव पाटील, गिरीष पाटील, संजय पाटील, दिलीपराव पाटील, पांडुरंग होनमाने, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्यवस्थापक सुजित शेख, कार्यकारी संचालक सुर्यकांत दळवी, प्राचार्य डॉ. भास्करराव जाधव, प.स.सदस्य बाळासाहेब निकम, बहे गावचे उपसरपंच मनोज पाटील, कार्याध्यक्ष सत्यजीत पाटील, क्रिडा निमंत्रक अनिकेत शिंदे, निमंत्रक अंकिता शेळके आदींची प्रमुख उपस्थिती होती.