Thursday, April 18, 2024
HomeUncategorizedयशश्री महिला बचत गटाच्या अन्नदानाने लोकांच्या सायंकाळच्याही भोजनाचा प्रश्न सुटला ; गरजू...

यशश्री महिला बचत गटाच्या अन्नदानाने लोकांच्या सायंकाळच्याही भोजनाचा प्रश्न सुटला ; गरजू लोकांच्या डोळ्यात आनंदाश्रू

मायणी ःता.खटाव जि.सातारा(सतीश डोंगरे)
कोरोना लाँकडाँऊन काळात होत्याचे नव्हते झाले संसाराचे टाके घालता घालता अनेक संसार उघड्यावर आले हाताला काम नाही व दोन दिवसाच अन्न नाही नाश लहान बाळांना उद्याच्या आशेवर किती दिवस जगणार बालकांच्या चेहऱ्यावर उदासीनता पाहून मन हेलावून जात पोटाची खळगी भरण्यासाठी मायणी येथे आलेले बिहारी, राजस्थान ,बेळगाव वाशी याला अपवाद नयेत यासाठी सामाजिक घटक पुढे येणे गरजेचे होते ही महत्त्वाची गरज ओळखून मायणी येथील चांदणी चौक येथे माजी आमदार डॉ दिलीपराव येळगावकर यांच्या पुढाकाराने यशश्री महिला बचत गट व डॉ दिलीपराव येळगावकर युवामंच तर्फे गेल्या २३ एप्रिल पासून सायंकाळी ७ ते ११ यावेळेत गरजू लोकांना मोफत भोजन वाटपाचे कार्य सुरू झाले आणि लॉकडाऊन काळात मायणी परिसरातील सर्वसामान्यवर आलेले उपासमारीचे संकट टळले.

लॉक डाऊन ,कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशातच न्हवे तर जगात दळणवळणच ठप्प झाले असल्याने सर्वसामान्य लोकांवर उपासमारीची कुऱ्हाड कोसळली .परंतु आपली संस्कृती मिळून मिसळून राहण्याची व घासातला घास देण्याची असल्याने डोळ्यादेखत उपासमार पाहणे शक्य नसल्याने येथील विनायक दुर्गाउत्सव मंडळाने सकाळी ९ ते ११ या वेळेत मोफत भोजन सुरू केले .परंतु सध्या कडक सुरू असलेला लॉकडाऊन व बंद असलेले छोटेमोठे उद्योग यामुळे तेल ,मीठ चटणी ही विकत घेऊ शकत नसल्याने दिवसाचे भागले परंतु रात्रीच्या भोजनाचा प्रश्न गरजू लोकांना भेडसावू लागला .

यासाठी तातडीने पुढाकार घेत माजी आमदार डॉ दिलीपराव येळगावकर यांच्या पुढाकाराने यांनी नागरिक कोणत्याही परस्थिती उपाशी राहणार नाहीत याची काळजी घेत “यशश्री महिला बचत गटाच्या माध्यमातून चांदणी चौक .येथे सायंकाळी ७ ते ९ या वेळेत गरजू लोकांना मोफत भोजन वाटपास सुरुवात केली. यावेळी डॉ येळगावकर स्वतः पुढे होऊन भोजन नेणाऱ्या लोकांची आपुलकीने चौकशी करीत ,धीर देत ,लोकांना योग्य अंतर आणि मास्क ,सॅनिटायझर वापरून आपली व आपल्या कुटुंबियांची काळजी घेऊन शासनाच्या नियमाचे पालन करण्यास सांगितले.

सौ.उर्मिला दिलीपराव येळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली काम करणाऱ्या यशश्री बचत गटाच्या या उपक्रमात सध्या ३०० च्या वर लोक भोजनाचा लाभ घेत आहेत.यास  विनायक दुर्गाउत्सव मंडळाने केलेल्या सकाळच्या भोजनाच्या सोयी बरोबरच सायंकाळच्या भोजनाचा कठीण प्रश्न सोडवल्याबद्दल भोजन नेणाऱ्या गरजू लोक आज माजी आमदार डॉ येळगावकर ,सौ उर्मिला येळगावकर यांना धन्यवाद देत आहेत.या उपक्रमात डॉ दिलीपराव येळगावकर युवा मंच चे राजाराम कचरे, उपसरपंच आनंदा शेवाळे ,ग्रा पं.सदस्य सुरज पाटील,जगन्नाथ भिसे,नितीन झोडगे,विजय (आण्णा)कवडे व मदतीला राज सामजिक संस्थेचे पदाधिकारी व जेष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके. सतीश डोंगरे, मोशीन पिंजारी, व स्पुर्ती क्रीडा मंडळ. यांचेसह अनेक कार्यकर्ते या सामाजिक कार्यात पुढाकार घेत आहेत.

यशश्री महिला बचत गटाच्या या उपक्रमास तहसीलदार अर्चना पाटील यांनी भेट देत सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या कार्याचे कौतुक केले व पोलीस अधिकारी शहाजी गोसावी,युवा नेते स.सचिन गुदगे,प्रत्यक्ष भेट देऊन समाधान व्यक्त केले

 

*चौकट- कोरोना मुळे सर्वसामान्यांची फरफट होत होती .यासाठी अनेक सामाजिक संघटना पुढे येऊन शिदा स्वरूपात मदत करीत होत्या परंतु आठवड्या काठी कुटुंबाचा भाजीपाला किराणा विकत आणणाऱ्या कष्टकऱ्यांच्या हाताला आज दोन महिने काम नाही. यामुळे तेल मिठही विकत घेऊ शकत नसल्याची सध्याची परस्थिती आहे यासाठी यशश्री बचत गटाच्या माध्यमातून पुढाकार घेत मोफत अन्नछत्र सुरू केले .याचा लाभ आज अनेक गरजू कुटुंबीय घेत आहेत.याचे मनस्वी समाधान आहे राजू कचरे ,सुरज पाटील जगन्नाथ भिसे, विजय कवडे,दिपक जाधव, नितीन (पिंटू)झोडगे अन्न वाटपाला यांचा संपूर्ण दिवस हे अन्न बनवण्यापासून लोकांच्या मुखात कसा जाईल यासाठी ही लोक धडपडत असतात याचे मला समाधान आहे..- उर्मिला दिलीपराव येळगावकर,अध्यक्षा-यशश्री बचत गट*

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular