एस टी वाहक यशवंत सगरे यांचा ठिकठिकाणी सत्कार

मायणी, ः(सतीश डोंगरे मायणी)
कोरेगाव आगाराचे प्रथितयश वाहक यशवंत हरिभाऊ सगरे हे 31 मे २०१८ रोजी सेवा निवृत्ती होणार असल्याने यापुढे सातारा- कान्हारवाडी गाडीवार ‘वाहक’ म्हणून येणार नसल्याने सातारा-कान्हारवाडी मार्गावर कान्हारवाडी, मायणी,म्हासुरणे, पुसेसावळी,वाळबी,रहीमतपूर,बसस्टॉपवर फेटा शाल,पुष्पहार देऊन ग्रामस्थांनी ,प्रवाश्यांनी सत्कार केला
मौजे कान्हारवाडी येथे यशवंत सगरे यांचा ग्रामस्था तर्फे सत्कार करण्यात आला मायणी येथे ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी विजय देशमुख,जेष्ठ पत्रकार दिलीप पुस्तके सर यांच्या हस्ते तर म्हासुरणे येथे सरपंच सचिन माने व ग्रामस्थ व कार्यकर्ते तसेच कळंबी येथे बजरंग सगरे,अर्जुन काळे व ग्रामस्थ यांनी सत्कार केला
सगरे यांनी १९९६ पासून २०१८ पर्यन्त सातारा-कान्हारवाडी गाडीवर सेवा इमानेइतबारे केली सौजन्य, नम्रता,शालिनता, वेळेचे बंधन त्यांनी आयुष्याभर पाळले ते अनेक प्रवाशांच्या सुख दुःखात सामील होत असत मुलगी सासरी जाताना किंवा येताना त्यांच्याच गाडीतून प्रवास करत असत याशिवाय शाळेतील मुले त्यांच्या गाडीत जागा मिळणारच अशी खात्री देत असत प्रवाशांशी आपुलकीच नातं त्यांनी जोडलं होत त्यांच्या सेवानिवृत्तीनंतरच्या आयुष्यात अनेकांनी शुभेच्छा दिल्या