योग संस्कृती ही भारताने जगाला दिलेली देण आहे: महेंद्र निंबाळकर

वाई ः माहिती तंत्रज्ञानाच्या युगात योगाला अनन्य साधारण महत्व आहे. निरोगी जीवन व्यथित करण्यासाठी नियमित योगा, प्राणायाम करणे आज काळाची गरज आहे.भारतात योग संस्कृती ही फार पूर्वी पासून चालत आली असून योग संस्कृती ही भारताने जगाला दिलेलं देण आहे, असे उदगार,वाई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक- महेंद्र निबांळकर यांनी किसनवीर महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात योगाचे महत्व विषद करताना काढले.किसनवीर महाविद्यालयात एन.सी.सी. कँडेटसाठीआयोजित केलेल्या योगा शिबिराचा समारोप व आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त आयोजित केलेल्या समारंभात ते बोलत होते.याप्रसंगी पतंजली योग समितीचे-अशोकराव मलटणे, रामदास राऊत, पांडुरंग भिलारे, लेप्टनंट-प्रा.समीर पवार, वाई पोलीस ठाण्याचे अनेक कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
निंबाळकर म्हणाले, धकाधकीच्या जीवनात आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. शैक्षणिक जीवनापासून प्रत्येक क्षणी विविध प्रकारच्या स्पर्धांना तोंड द्यावे लागते. स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्यासाठी मन अतिशय खंबीर असावे लागते, मन खंबीर करण्यासाठी नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे. प्रशासकीय सेवेत मन अतिशय खंबीर,शांत, उत्साही राहण्यासाठी नियमित एक तास योग-प्राणायाम करणे आवश्यक आहे. नित्य नियमित व्यायाम ही यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे, जीवनात जसे मुलभूत गरजांना महत्व आहे, तसेच निरोगी आरोग्यालाही महत्व आहे. यावेळी योगाचे महत्व धनंजय मलटणे, पांडुरंग भिलारे, रामदास राऊत यांनी विषद करीत योगाची प्रात्यक्षिके करून दाखवीली महाविदयालयात आयोजित शिबिराला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. शंभर विद्यार्थ्यांनी शिबिरात सहभाग घेतला.
वाई पतंजली योग समिती द्वारे योग दिन विविध ठिकाणी साजरा करण्यात आला. यामध्ये शेतकरी बहुउद्देशीय सभागृह बाजार समिती वाई, परखंदी हायस्कूल, महाराष्ट सोसायटी वाई , पसरणी हायस्कूल, शेंदुरजणे हायस्कूल, गरवारे कंपनी वाई, न्यू इंग्लिश स्कूल बोरगाव,द्रविड हायस्कूल, आसरे हायस्कूल,पतित पावन हायस्कूल वेळे, तसेच तालुक्यातील विविध माध्यमिक, प्राथमिक शाळांमध्येहीयोगांचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी सकाळच्या सत्रात तालुक्यातील शाळा भरविण्यात आल्या. वाई शहरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहून योग दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमास पतंजली योग समितीचे योगप्रशिक्षक-डॉ. सुनील देशपांडे, भैरवनाथ गव्हाणे, सुनंदा कट्टे, सुभाष यादव, यशवंत डेरे, राजश्री खोतलांडे, अलका घाडगे,पतंजली योग समितीचे पदाधिकारी यांनी वाई तालुक्यात विविध ठिकाणी विद्यार्थ्यांसमोर योगाची प्रात्यक्षिक करून दाखवीत त्यांच्या कडून करून घेतली. तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या उपक्रमात सहभाग घेतला.