योगेश्वर दत्तचे आव्हान संपुष्टात…

ब्राझील : रिओ ऑलिम्पिकच्या पहिल्याच सामन्यात मंगोलियाच्या पैलवानाकडून भारताच्या योगेश्वर दत्तला ०-३ असा पराभव पत्करावा लागला. परंतु ‘रिपेशाज’नुसार त्याला कांस्यपदकासाठी खेळता येईल अशी आशा होती. मात्र मंगोलियाचा पैलवान पुढच्या फेरीत पराभूत झाला आणि योगेश्वरचे ऑलिम्पिकमधील आव्हान संपुष्टात आले. आज ऑलिम्पिकच्या शेवटच्या दिवशी योगेश्वर दत्त पुरुषांच्या ६५ किलो वजनी गटाच्या फ्री स्टाइल सामन्यासाठी मैदानात उतरला. त्यावेळी मंगोलियाचा पैलवान गँझोरीगीन याने योगश्वरला ०-३ अशी मात दिली.