Friday, March 29, 2024
Homeठळक घडामोडीराष्ट्रवादीला कोंडीत पकडण्याचा घाट

राष्ट्रवादीला कोंडीत पकडण्याचा घाट

अविश्‍वास ठरावाच्या विरोधात काँग्रेस आक्रमक
सातारा : जिल्हा परिषदेचे कृषी सभापती शिवाजीराव शिंदे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेते व विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांनी काढलेल्या विशेष व्हीपच्या आदेशामुळे सह्यांची मोहिम राबवून अविश्‍वास ठराव आणला आहे. या ठरावाच्या संदर्भात जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात दि. 30 जुलै 16 रोजी सकाळी 11 वा. विशेष सभा बोलविण्यात आली आहे. या अविश्‍वास ठरावाच्या अनुषंगाने सध्या दोन नंबरवर असलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्यांचे पाठबळ कृषी सभापती शिंदे यांना मिळणार असल्याचे खात्रीशीर वृत्त आम्हाला मिळाले असून, राष्ट्रवादी काँग्रेस अविश्‍वास ठरावाच्या बाजुने 44 आकडा पुर्ण करणार का? याची उत्सुकता राजकीय वर्तुळात लागून राहिली आहे.
जि.प.चे अध्यक्षपदाची निवड ज्यावेळी झाली. त्यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या 37 जि.प. सदस्यांना व्हीपचा आदेश काढून राष्ट्रवादीच्याच उमेदवाराला मतदान करण्याचे आदेश दिले होते. यातच ठरल्याप्रमाणे कृषी सभापती शिवाजीराव शिंदे यांच्याविरोधात अविश्‍वास ठराव आणण्याचे दृष्टीने छत्रपती शिवाजी सभागृहात सह्यांची मोहित जाणीवपूर्वक राबविण्यात आली. कृषी सभापती शिंदे यांना कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या पदावरून हटविण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी चंग बांधला असून या लढाईमध्ये कोणाचा विजय होणार व कोणाचा पराभव होणार याची उत्सुकता लागून राहिली असली तरी रविवार दि. 24 जुलै 16 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ना. रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या उपस्थितीत सह्याद्री सहकारी साखर कारखान्यावर विशेष सभा घेऊन राजकीय खलबते आखण्यात आली, तर सातार्‍यामध्ये जिल्हा राष्ट्रीय काँग्रेस भवनमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांचा व पदाधिकार्‍यांचा जिल्हास्तरीय मेळावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व जिल्हाध्यक्ष आ. आनंदराव पाटील यांच्या उपस्थितीत नुकताच झाला. प्रामुख्याने या मेळाव्यातही जि.प.मध्ये असलेले दोन्ही काँग्रेसचे हाडाचे वैर शब्दाचे रूपाने नेत्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले. आपला राष्ट्रवादी पक्ष हा मित्र पक्षच नाही उलट या पक्षानेच जातीवादी पक्ष असलेल्या भाजपाला सत्तेवर आणण्यासाठी सहकार्य केले असा आरोपही आ. जयकुमार गोरे यांनी जाहिर केला. तसेच कृषी सभापती शिवाजीराव शिंदे यांच्या संदर्भात काँग्रेसने तातडीने बैठक घेऊन शिंदे यांना सहकार्य करण्याची भूमिका ठेवली असल्याचे एका जबाबदार काँग्रेसच्या पदाधिकार्‍याने दै. ग्रामोध्दारच्या प्रतिनिधीजवळ बोलताना दिले आहे. प्रामुख्याने जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेसचे 27 जि.प. सदस्य आहेत. आ. शंभूराज देसाई गटाचे पाटण विकास आघाडीचे दोन, जावली विकास आघाडीचे दिपक पवार तसेच सातारा विकास आघाडीचे अध्यक्ष खा. श्री.छ. उदयनराजे भोसले गटाचे जि.प. सदस्यांची भुमिकाही शिंदे यांच्या बाजुने राहणार की नाही याबाबत राजकीय वर्तुळात खलबते सुरू असून कृषी सभापती शिवाजीराव शिंदे यांच्या विरोधात दाखल झालेला अविश्‍वास ठराव जिंकण्यासाठी राष्ट्रवादीला 44 आकडा पार करावा लागणार आहे. यामुळे हा आकडा पार करताना राष्ट्रवादीची दमछाक होणार का? याबाबतही सध्या जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चेला ऊत आला आहे. एकुणच 30 जुलै होणार्‍या विशेष सभेकडे संपुर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular