मेढा ( प्रतिनिधी ) जिल्हा परिषद व पंचायत समिती कडील सेवानिवृत्त कर्मचारी, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, पंचायत विस्तार अधिकारी, व सेवानिवृत गटविकास अधिकारी यांचा सातारा जिल्हयातील संयुक्तिक एकत्रित मेळावा ९ जुन रोजी आयोजीत केल्याची माहिती सेवानिवृत्त पेन्शनर संघटना सातारा जिल्हा सचिव वसंतराव माळी यांनी दिली.
अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, हा मेळावा शुकवार दि. ०९ / ०६ / २०२३ रोजी दुपारी ठिक १ वाजता ग्रामसेवक भवन शाहूनगर सातारा येथिल इमारतीमध्ये संघटनेचे अध्यक्ष श्री.व्ही.डी. सावंत यांच्या अध्यक्षतेखाली भरविण्यात आलेला आहे. या मेळाव्यामध्ये सभासदांची अडी अडचणी बाबतीत तसेच महत्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे.
तरी या मेळाव्यास जिल्ह्यातील सर्व सेवानिवृत्तांनी उपस्थित रहावे असे आवाहन पेन्शनर संघटनेचे जिल्हा सचिव वसंतराव माळी यांनी केले आहे.
जिल्हा परिषद सेवानिवृत्तांचा शुक्रवारी वार्षिक मेळावाचे आयोजन
RELATED ARTICLES