मेढा प्रतिनिधी – पश्चिम महाराष्ट्रात अग्रगण्य असणाऱ्या प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेत राजेंद्र बोराटे यांना चेअरमनपदी मिळालेली संधी फलटणकर यांच्या दृष्टीने अभिमानास्पद असून त्यांना मिळालेल्या या संधीचा वापर बँकेच्या प्रगतीसाठी करावा असे उदगार विधान परिषदेचे माजी सभापती आ.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.
प्राथमिक शिक्षक सहकारी बँक साताराचे चेअरमनपदी राजेंद्र बोराटे यांची निवड झाल्याबद्दल कोळकी ग्रामस्थ, फलटण तालुका सभासद परिवर्तन पॅनल यांच्या वतीने आयोजित सन्मान सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी फलटण तालुक्याचे आमदार दीपकराव चव्हाण, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे नेते उदय शिंदे, अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ दोंदे गटाचे नेते दीपक भुजबळ, प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे माजी चेअरमन बलवंत पाटील, शिक्षक बँकेचे व्हाईस चेअरमन विजय बनसोडे,शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत यादव शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष विश्वंभर रणवरे, सरचिटणीस संघ सुभाषराव ढालपे, सरचिटणीस समिती किरण यादव यांची उपस्थिती होती.
अधिक बोलताना त्यांनी सांगितले की, सध्या बँकिंग क्षेत्रात स्पर्धा वाढत आहे. या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी शिक्षक बँकेने सभासदांना नेट बँकिंगच्या विविध सुविधा उपलब्ध करून द्याव्यात यामुळे बँक अधिक सुदृढ होण्यास मदत होणार आहे. शिक्षक नेते संभाजीराव थोरात यांना राज्यपाल नियुक्त आमदार पदासाठी शिफारस करणारअसल्याची ग्वाही यावेळी श्रीमंत रामराजे यांनी दिली.
यावेळी आमदार दीपक चव्हाण यांनी प्राथमिक शिक्षकांच्या मागण्या व प्रश्न सोडविणे कामी स्वतः शासन स्तरावर पाठपुरावा करणार असून शासन नेहमीच प्राथमिक शिक्षकांच्या पाठीशी उभे राहिल असे सांगितले.
यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात यांनी सांगितले की, श्रीमंत रामराजे हे स्वतः एक शिक्षक सुद्धा असल्याने त्यांच्याकडून बऱ्याचशा गोष्टी शिकण्यासारख्या आहेत.चेअरमन पदाचा फलटण ला 40वर्षानी बहुमान राजेंद्र बोराटे यांचे माध्यमातून दिला आहे नक्की च ते दैदिप्यमान कामगिरी करून शिक्षक बँक
ची प्रगती व सभासद यांचे हिताचे निर्णय घेण्यात यशस्वी होतील,
पुढे बोलताना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे नेते उदय शिंदे यांनी ,सध्याचे चेअरमन व संचालक मंडळ सभासद हिताचा कारभार करण्यासाठी कटिबद्ध असून ते आपले काम चोख पार पाडतील असे सांगितले.
प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे माजी चेअरमन बलवंत पाटील यांनी श्रीमंत रामराजे यांच्या नेतृत्वाखाली चालणारी सातारा जिल्हा सहकारी बँक आशिया खंडात आदर्श बँक म्हणून ओळखली जाते असे सांगून या वेळी आपली प्राथमिक शिक्षक सहकारी बँक शतकमहोत्सवी वर्ष आगामी वर्षात करीत आहे या शतक महोत्सवी वर्षात बँक नेत्रदीपक कामगिरी करून दाखवेल असा विश्वास व्यक्त केला.
आपल्या तीस वर्षातील संघटनात्मक कार्याचा उल्लेख करताना बँकेचे चेअरमन राजेंद्र बोराटे यांनी श्रीमंत रामराजे यांच्या आशीर्वादाने आपल्याला यशस्वीपणे वाटचाल करता आली असून आज पर्यंतच्या कार्यात सहकार्य करणाऱ्या सर्व शिक्षक संघाचे नेते, पदाधिकारी व परिवर्तन पॅनल चे पदाधिकारी सगळ्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
प्रास्ताविक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष द .बा. पवार व शिक्षक समीतीचे तालुकाध्यक्ष संतोष कोळेकर यांनी केले.कार्यक्रमाला बँकेचे संचालक, शिक्षक संघाचे नेते नारायण संकपाळ, दिलीप मुळीक, तानाजी ढमाळ,कुष्णात कुंभार, रघुनाथ कुंभार, ह.सो.गायकवाड,मधुकर गावडे, आण्णासाहेब शेवते, नवनाथ गावडे, संभाजी कदम, व शिक्षक समितीचे पदाधिकारी नेते सुरेंद्र घाडगे, सतिश नलवडे, उदयकुमार नाळे, गणेश तांबे, सोमनाथ लोखंडे, भगवंत कदम,रा.ना शेडगे,जिल्ह्यातील शिक्षक बॅकेचे संचालक माजी चेअरमन नवनाथ जाधव, शशीकांत सोनवलकर,सौ.निशा मुळीक,सौ.पुष्पलता बोबडे,राजु ढमाळ, नितीन फरांदे,संजय सपकाळ, ज्ञानबा ढापरे, विशाल कणसे, शहाजी खाडे, नितीन राजे, तानाजी कुंभार, नितीन शिर्के, सुरेश पवार, संजीवन जगदाळे, बॅकेचे सिईओ छगन खाडे, तालुकाध्यक्ष सुरज तुपे,जयकर खाडे,कोळकीचे माजी सरपंच दत्तोपंत शिंदे, कोळकीचेसरपंच स्वप्ना कोरडे,माजी सरपंच रेश्मा देशमुख,प.स सदस्य सचिन रणवरे,पै.संजय देशमुख,संजय कामठे,माजी सभापती रामभाऊ ढेकळे, ग्रामस्थ कोळकी बहुसंख्येने उपस्थित होते.आभार कुष्णात कुंभार यांनी मानले सुत्रसंचलन माधुरी सोनवलकर यांनी केले.