रहिमतपूर : वेलंग (शिरंबे) ता. कोरेगाव येथे तीन घरात चाकूचा दाखवत मारहाण करुन दोन बंद घरांत घरफोडी करीत 75 हजार रुपयांचा मुद्देमाल तीन अज्ञात चोरट्यांनी लांबविला. याप्रकरणी त्यांच्याविरुध्द सौ. मनिषा संतोष अत्रे (रा. रंगनाथ स्वामी निगडी) यांनी रहिमतपूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
याबाबत पोलीस ठाण्यातून अधिक माहिती अशी की, दि. 21 डिसेंबर रोजी पहाटे पाच वाजता तीन अनोळखी इसमांनी तोंडाला रुमाल बांधलेल्या अवस्थेत दरवाजा ठोठवला संतोष अत्रे यांनी दरवाजा उघडताच त्यांनी जबरदस्तीने घरात घुसून कपाटाच्या चाव्या द्या असे म्हणत मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी इतर दोन जणांनी गोदरेज कपाट कटावणीच्या साह्याने लॉकर तोडून त्यातील डब्येतील रोख रक्कम 5 हजार पाचशे, कपडे मोबाईल तसेच चाकूचा धाक दाखवून गळ्यातील मंगळसूत्र काढून घेतले. त्याचप्रमाणे गावातील वसंत दिनकर हुंबे यांचे किरकोळ साहित्य व शिरंबे येथील माधव आण्णा रिटे यांचे 5 हजार रुपये व सोपान रद्रा गायकवाड, शंकर मारुती फडतरे यांचे बंद घर घराचे दरवाजे फोडून चोरीचा प्रयत्न झाला. यात 77 हजार आठशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला.
दरम्यान मदतीला आलेले रजत जेधे या तरुणाने चोरट्याच्या मागे पळत जावून एका चोरट्याला पकडले. परंतु, झोलल्या झटापटीत झाली पुढे पळत गेलेल्या चोरट्यांनी रजत जेधे या तरुणाला हातातील कोयत्याचा धाक दाखवित पलायन केले. या घटनेचा अधिक तपास रहिमतपूर पोलीस करीत आहेत.
चाकूचा धाक दाखवत मारहाण करुन 75 हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबविला
RELATED ARTICLES