Tuesday, June 24, 2025
Homeठळक घडामोडीमाणदेशी महिला सहकारी बँकेस कार्नार्ड्स बँकिंग गौरव मानांकन प्रथम पुरस्कार

माणदेशी महिला सहकारी बँकेस कार्नार्ड्स बँकिंग गौरव मानांकन प्रथम पुरस्कार

माणदेशी महिला सहकारी बँकेस कार्नार्ड्स बँकिंग गौरव मानांकन प्रथम पुरस्कार

म्हसवड: कर्नाडस्बँकींग रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाऊंडेशन कोल्हापुर तर्फे येथील माण देशी महिला सहकारी बँकेस सर्वोत्तम अध्यक्षा श्रीमती चेतना सिन्हा,सर्वोत्त मकार्यकारी अधिकारी रेखाताई कुलकर्णी, सर्वोत्तम महिला विशेष वसुली अधिकारी रुकसाना मुलाणी यांचे सह सर्वोत्तम आर्थिक अहवाल व आर्थिक सक्षम आणि उत्तम व्यवस्थापन असणारी बँक असे तब्बल पाच कर्नाडस्बँकींग गौरव मानांकन हे प्रथम पुरस्कार देऊन माण देशी बँकेस हया बँकेच्या पदाधिका-यांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
कोल्हापुर येथील प्रिन्सेस पद्जाराजे गर्ल्स हायस्कूल मधील रामगणेश गडकरी सभागृहात संपन्न झालेल्या राज्यातील नागरी सहकारी आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकाच्या राज्यव्यापी सहकार बँकिंग परिषदेत हा पुरस्कार देण्यात आला.
या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य सहकारी बुक आणि महाराष्ट्र अर्बन बॅक्स फेडरेशन मुंबईचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मुंबई चे माजी व्यवस्थापकीय अधिकारी प्रमोद कर्नाड. पणन संचालक तथा सहकार अप्पर आयुक्त दिनेश ओहुळर,विश्‍वासठाकूर, आ. शिवेंद्रराजे भोसले, प्रकाशआवाडे,निपुनराव कोरे, प्रमोद कर्नाड इत्यादी प्रमुख मान्यवर उपस्थितीत होते.ग्रामीण व दुष्काळी माण तालुक्यात माण देशी महिलां बँक 1997 मध्ये श्रीमती चेतना सिन्हा यांनी सुरु केली.या बँकेच्या आठ शाखा कार्यरत आहेत.सभासद संख्या,ठेवी,कर्ज पुरवठा,कर्ज वसुली ची टक्केवारी व या बँकेतील व्यवस्थापनसह सर्वोत्तम आर्थिक सक्षम सह आर्थिक अहवाल अहवालामध्येही सर्वोत्कृष्ट गणली गेल्यामुळे माण देशीने वरील प्रथम क्रमांकाचे पाच पुरस्कार प्राप्त केले.
हे पुरस्कार स्विकारण्यास माण देशी बँकेच्या सौ. रेखाताई कुलकर्णी, रुकसाना मुलाणी,बँकेच्या संचालिका सौ.रोहिणी बाड,सौ.मंजुषा सुर्यवंशी,सौ.वनिता पिसे,सौ.राजश्री दोशी उपस्थित होत्या. माण देशी बँकेसह या बँकेच्या अध्यक्षा, अधिकारी व पदाधिकारी यांचे सर्व स्तरातुन अभिनंदन होतआहे.
कॅप्शन-माणदेशी महिला सहकारी बँकेस पाच कर्नाडस्बँकींग गौरव मानांकन हे प्रथम पुरस्कार दिनेश ओहुळकर,विश्वास ठाकुर व शिवेंद्र राजे भोसले यांचे हस्ते स्विकारताना रुकसाना मुलाणी, रेखाताई कुलकर्णी,रोहिणी बाड,मंजूषा सूर्यवंशी, वनिता पिसे,राजश्री दोशी.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular