Monday, June 23, 2025
Homeठळक घडामोडीअवैधरित्या वाळू भारणार्‍या पाच जणांवर कारवाई डंपर, ट्रक व ट्रॅक्टरसह 10...

अवैधरित्या वाळू भारणार्‍या पाच जणांवर कारवाई डंपर, ट्रक व ट्रॅक्टरसह 10 लाखांचा मुद्देमाल ताब्यात

म्हसवड : माणगंगा नदीपात्रात म्हसवड नजीक असणार्‍या राउतवाडी गावाच्या हद्दीत अवैधरित्या वाळू भारणार्‍या पाच जणांवर म्हसवड पोलिसांनी सपोनि मालोजीराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करीत एक डंपर, एक ट्रक व एक ट्रॅक्टर असा सुमारे 10 लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.
याबाबत म्हसवड पोलिसांनी दिलेली माहिती अशी म्हसवड नजीक राउतवाडी गावाच्या हद्दीत माणगंगा नदी पात्रात विनापरवाना वाहनात वाळू भरत असल्याची खबर मिळाल्याने सपोनि मालोजीराव देशमुख यांनी सदर वाहने ताब्यात घेऊन कारवाई करण्यास सांगितले. त्यानुसार म्हसवड पोलिसांनी दोन पथके तयार केली यामध्ये स्थानिक गुन्हे शाखा सपोनि व्ही. एस. जाधव,विक्रम पिसाळ, मयूर देशमुख, शरद बेबळे, निलेश काटकर, कांतीलाल नवघणे, प्रवीण फडतरे, मोहन नाचण, विजय सावंत, मारुती आडागळे हे दोन सरकारी वाहनातून सदर ठिकाणी गेले.वाहने बाजूला लावून माणगंगा नदीत हे सर्वजण गेले असता 4 ते 5 जण अवैधरित्या वाळू भरताना आढळून आले.त्यांना याबाबत विचारले असता त्यांनी वहाण मालकांची नावे सांगितली त्याप्रमाणे नितीन कलढोणे, राउतवाडी, आकाश गिरी गुरवगल्ली (म्हसवड), शांताराम शिंगाडे, शिरताव, ता.माण, बाळासाहेब वीरकर व किसन बनगर रा.बनगरवाडी, विक्रम लक्ष्मण राऊत, व रवी टाकणे रा.म्हसवड यांची असून त्यामध्ये विनापरवाना, चोरून भरली जात होती. त्यावरून पोलिसांनी कारवाई करीत ट्रक क्रमांक चक-न 1449 अंदाजे किंमत 9 हजार रुपयांची वाळू व ट्रकची किंमत 3 लाख रिपाई, पिवल्या रंगाचा लेलंड क्रमांक चक 10 न 3107 यामध्ये 4 लाख किमतीचा डंपर व 12 हाजार रुपयांची वाळू,लाल रंगाचा आयशर कंपनीचा ट्रॅक्टर व ट्रॉली किंमत एक लाख पन्नास हजार 3 हजार रुपयांची चोरटी वाळू असा सुमारे 10 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.पुढील तपास व्ही.एम.जाधव करत आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular