कराड येथे 24 रोजी 19 वी बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन
कराडः भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा व कराड तालुका यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे . भारतीय बौद्ध महासभा च्या राष्टीय अध्यक्षा महा उपासिका मिराताई आंबेडकर यांच्या मागदर्शना खाली गेली 18 वर्ष बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन केले जात आहे . दि . 14 ते 24 डिसेंबर 2018 या कालावधीत विविध शिबिरांचे अयिजन केले आहे त्या सर्व शिबिरांचा समारोप या परिषदे मध्ये होणार आहे या परिषदेसाठी सातारा व कराड तालुक्यातील जस्तीतजास्त बौद्ध उपासक ,उपसिकांनी उपस्थित रहावे आहे आवाहन भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा चे अध्यक्ष व्ही . आर .थोरवडे यांनी केले आहे .
कराड येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर बुधवार पेठ कराड येथे श्रामणेर शिबीर , समता सैनिक दल शिबीर तर कराड तालूक्यातील वराडे ,बेलावडे , किरपे , सातारा तालुक्यातील चिंचणेर वदंन , आरेदरे , फलटण तालुकयातील सुरवंडी ,संगमनगर , पाटण तालुक्यातील येरफळे ,आढुळ,खटाव तालुक्यातील वडी,वरुड ,केरेगाव तालुक्यातील शिरंबे ,न्हावी बु ., माण तालुक्यातील शिंदी बु. दहिवडी ,देवापुर आणि हिंगणी या गावात उपासिका धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे .या सर्व शिबिरांचा समारोप या परिषदे मध्ये होणार आहे .
कराड येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर क्रीडागण येथे होणार्या या बौद्ध धम्म परिषदेच्या अध्यक्ष स्थान सातारा जिल्हा चे अध्यक्ष व्ही . आर .थोरवडे भूषवणार असून या परिषदेसाठी भारतीय बौद्ध महासभा चे कर्याध्यक्ष भीमराव आबेडकर , मुंबई चैत्य भूमीचे पूज्य भन्ते दिपंकर ,भारतीय बौद्ध महासभा चे राष्ट्रीय सचिव एन .एम .आगाणे,एस .एस.माने,मुंबई प्रदेश अध्यक्ष डी .एम. कांबळे ,कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष एस.पी. दीक्षित ,मुंबई प्रदेश सचिव उत्तम मगरे , महाराष्ट्र सचिव आनंदा सातपुते,पुणे येथील डॉ .अशोक शिलवन्त , सांगली जिल्हा अध्यक्ष जितेंद्र कोलप ,पुणे जिल्हा अध्यक्ष विजयराव गायकवाड ,प. महाराष्ट्र सचिव रुपेश तांमगावकर , पारेषनचे सेवानिवृत्त जनरल मॅनेजर सुदाम ढापरे , मुंबई सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता दिलीपराव थोरवडे ,उधोजक योगेश पाटणकर , भारिप चे जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत खडाईत, सेवानिवृत्त असि . कमिशनर सेंटर एक्ससाईज व्ही .एस गायकवाड , डॉ मीनाताई इंजे ,प्राचार्य सुरेश खराते ,प्राचार्य रमेश जाधव , प्राचार्य बी.एन .कालेकर ,सेवानिवृत्त असि .संचालक वित्त विभाग सातारा चे अरुण गायकवाड आदी मान्य उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत तरी या परिषदेसाठी सातारा व कराड तालुक्यातील जस्तीतजास्त बौद्ध उपासक ,उपसिकांनी उपस्थित रहावे आहे आवाहन भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा चे अध्यक्ष व्ही . आर .थोरवडे यांनी प्रसिद्धी पत्रका व्दारे केले आहे .
कराड येथे 24 रोजी 19 वी बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन
RELATED ARTICLES